शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

Russia Ukraine War: धक्कादायक! युक्रेनमध्ये रस्त्यांत सापडले मृतदेह; युद्धाचं भीषण वास्तव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 9:35 AM

रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली.

कीव्ह : युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी केलेल्या भीषण अत्याचारांची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहे. या युद्धाच्या ३९ व्या दिवशी युक्रेनने असा आरोप केला की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील बुका या भागामध्ये काही जणांचे हात बांधून व त्यांच्या डोक्यात गोळ्या मारून हत्या केली. अनेकांचे मृतदेह रस्त्यांमध्ये फेकून देण्यात आले. या आरोपांबाबत रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

कीव्हच्या बुका, इप्रिन, होस्टोमेल या उपनगरांमधून रशियाचे सैन्य माघारी गेल्यानंतर ती सारी ठिकाणे युक्रेनच्या सैनिकांनी ताब्यात घेतली आहे. या परिसरात रशियाच्या सैनिकांनी हत्याकांडे केल्यानंतर ते मृतदेह रस्त्यांत किंवा इमारतींच्या आडोशाला फेकून दिल्याचे आढळून आले. बुका येथे व इतर ठिकाणी रस्त्यांवर टाकून दिलेल्या युक्रेन नागरिकांच्या मृतदेहांचे व्हिडीओ सोशल मीडियावर झळकले आहेत. 

एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना महापौर अनातोला फेझोरुक यांनी सांगितले की, रशियन सैन्याने बाह बुका शहर ताब्यात घेतले आहे. आम्ही आधीच २८० लोकांना सामूहिक कबरीत दफन केले आहे. ते म्हणाले की, रशियन आक्रमणात बूका शहराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत.

आणखी निर्बंध लादा- युक्रेन

रशियाच्या लष्कराने केलेल्या अनन्वित अत्याचारांचे पुरावे आता जगासमोर आले आहेत. त्यामुळे रशियावर आणखी कडक निर्बंध लादावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी याआधी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीही युक्रेनशी युद्ध थांबविण्यास रशिया तयार नाही. 

रशियाकडून नैसर्गिक वायूची खरेदी बंद-

लिथुआनिया या देशाने रशियाकडे नैसर्गिक वायू खरेदी करणे बंद केले असून हा निर्णय या महिन्याच्या प्रारंभापासून लागू झाला आहे. असा निर्णय घेणारा हा युरोपातील पहिला देश आहे. युरोपीय समुदायातील अन्य देशांनीही आपले अनुकरण करावे, असे लिथुआनियाने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्याने युरोपातील अनेक देशांनी रशियावर नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय