Russia Ukraine War: धक्कादायक आकडेवारी! युक्रेनमधून ४० लाख मुले-माणसे परागंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:32 AM2022-04-04T05:32:15+5:302022-04-04T05:32:26+5:30
Russia Ukraine War: रशियाच्या आक्रमणाशी झुंज़णाऱ्या युक्रेनमधून २९ मार्च २०२२ अखेर एकूण ४० लाखांवर मुले-माणसे देश सोडून परागंदा झाली आहेत. या इतक्या लोकांना तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी युक्रेनच्या शेजारी देशांवर येऊन पडली आहे.
रशियाच्या आक्रमणाशी झुंज़णाऱ्या युक्रेनमधून २९ मार्च २०२२ अखेर एकूण ४० लाखांवर मुले-माणसे देश सोडून परागंदा झाली आहेत. या इतक्या लोकांना तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी युक्रेनच्या शेजारी देशांवर येऊन पडली आहे. पोलंड, रुमानिया आणि मोल्दोव्हा या युक्रेनच्या सीमावर्ती देशांमध्ये निर्वासितांचे सर्वाधिक लोंढे येणार हे स्वाभाविकच होते, पण या देशांनी अडचणीतल्या शेजाऱ्यांसाठी आपल्या घरांची दारे प्रेमाने उघडलेली दिसतात. महिन्याभरानंतर शांतीवार्ता सुरु झाल्याच्या बातम्यांनी काही निर्वासित घरोघरी परतण्याची शक्यता वाढली असली, तरी या युद्धामुळे एकूण १२ दशलक्ष लोकांना मदतीची गरज लागेल, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे.
युक्रेनमधून बाहेर पडलेले लोक गेले कुठे ?
२२ मार्च २०२२ अखेरची अधिकृत आकडेवारी
पोलंड २३ लाख १४ हजार ६२३
स्लोव्हाकिया २ लाख ७८ हजार २३८
रुमानिया ६ लाख २ हजार ४६१
हंगेरी २ लाख २५ हजार ४६
मोल्दोव्हा ३ लाख ८५ हजार २२२
बेलारूस ९ हजार ८७५
रशिया २ लाख ७१ हजार २५४
यात रूमानिया आणि मोल्दोव्हा या देशांच्या सीमा ओलांडणाऱ्या लोकांचाही समावेश आहे
संदर्भ : संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा आयोग आणि स्टॅटिस्टा