कीव – यूक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. यूक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी Donetsk मध्ये ५ स्फोट झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती. यूक्रेनवर लष्करी कारवाई करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानंतर आता युद्ध सुरु झालं आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, यूक्रेन-रशिया युद्ध टाळू शकत नाही. त्यासाठी रशिया स्पेशल मिलिट्री ऑपरेशन लॉन्च करत आहे. यूक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावं. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी लक्षात ठेवावं की रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.
रशियानं हल्ला सुरु केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रशियाचे प्रतिनिधी म्हणाले की, पुतिन यांनी ज्या स्पेशल ऑपरेशनची घोषणा केली आहे. ती यूक्रेनच्या वर्षोनुवर्ष जे लोकं अडचणीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी केली आहे. यूक्रेनमधील मानवी नरसंहार बंद करायचा आहे. जो काही निर्णय घेतला आहे तो यूएन चार्टरच्या कलम ५१ च्या प्रमाणे घेतला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तर यूएनच्या या बैठकीत यूक्रेनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
यूएन प्रतिनिधी बैठकीत म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी ऑन रेकॉर्ड युद्धाची घोषणा केली आहे. आता हे युद्ध रोखण्याची जबाबदारी यूएनची आहे. मी सर्वात आधी युद्ध रोखण्याचं आवाहन करतो. आता पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली तो व्हिडीओही दाखवावा लागेल का? यूक्रेनवर रशियानं हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी या हल्ल्यात होणारी जीवितहानी आणि नुकसानीसाठी केवळ रशिया एकटी जबाबदार आहे. अमेरिका आणि सहकारी देश याला प्रत्युत्तर देणार आहे. मी राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी संपर्कात आहे. तसेच NATO सोबत समन्वय सुरु आहे.
यूक्रेनमध्ये Do Not Fly Zone घोषित
यूक्रेनच्या सीमेवर परिस्थिती गंभीर होत एअरलाईन्सनं त्या परिसरात Do Not Fly Zone घोषित केले आहे. यूक्रेन आणि रशिया बोर्डरवर प्रतिबंध करण्यात आला आहे. किवसह यूक्रेनच्या सर्व एअरपोर्ट्सवरील फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.