मॉस्को - युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशिया आज आपला ७७वा व्हिक्ट्री दिवस साजरा करत आहे. या विजयी परेडमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं भाषण युक्रेनमधील विविध भागांचं नाव घेत सुरू केलं. पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध केलेली कारवाई ही योग्य असल्याचेही सांगितले.
रशियाच्या विजय दिवसाच्या दिवशी पुतीन यांनी नाटोलाही घेरले. पुतीन म्हणाले की, नाटो रशियाच्या सीमांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच युक्रेननेही अण्वस्रांच्या वापराची धमकी दिली होती.
विजय दिवसानिमित्त पुतीन यांनी सांगितले की, आम्हाला ही कारवाई करावी लागली कारण आमच्या हाती तेवढंच होतं. युक्रेनवरील कारवाईचा निर्णय हा एका सार्वभौम आणि स्वतंत्र देशानं घेतला आहे.
रशियाच्या या व्हिक्ट्री डे सोहळ्याचं सध्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाशी काही घेणं देण नाही आहे. हा व्हिक्ट्री डे दुसऱ्या महायुद्धाशीसंबंधित आहे. आज म्हणजेच ९ मे १९४५ रोजी मध्यरात्री युरोप आणि आफ्रिकेच्या उत्तर भागात सुरू असलेल्या युद्धाची सांगता झाली होती.