शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

Russia-Ukraine War: 'टायटॅनिक'च्या अभिनेत्याची युक्रेनला मोठी मदत, पुनर्वसनासाठी दिले 76 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 11:52 AM

लिओनार्डो डी कॅप्रिओचे युक्रेनशी जुने नाते आहे, लिओची आजी युक्रेनमधील ओडेसाची रहिवासी होती.

कीव:युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडलाय. यातच विविध क्षेत्रातील लोकांसह सेलिब्रिटीही युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. दरम्यान, हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओ (Leonardo Dicaprio) युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

लिओनार्डो डी कॅप्रिओने 10 मिलीयन अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार 76,88,95,000 कोटी रुपये) दान केले आहेत. त्याची ही आर्थिक मदत युक्रेनला अडचणीच्या काळात मोठी मदत आहे. विशेष म्हणजे लिओनार्डोची आजी युक्रेनमधील ओडेसा येथील होती. अशा परिस्थितीत, त्याचे युक्रेनशी घट्ट नाते आहे. 

लिओच्या आईचा जन्म बॉम्ब शेल्टरमध्ये झाला लिओनार्डोने अनेकदा सांगितले आहे की, तो अर्धा रशियन आहे, त्याचे आजी आजोबा रशियाचे आहेत. काही रिपोर्टमध्ये त्याचे आजी-आजोबा ओडेसाचे, तर काहींच्या मते खेरसनचे होते. ओडेसा आणि खेरसन युक्रेनमधील शहरे आहेत. लिओनार्डोची आई इमरलिन इंडेनबिर्केनचा जन्म एका बॉम्ब शेल्टरमध्ये झाला होता. त्याचे आई-वडील, म्हणजे लिओनार्डोचे आजी-आजोबा रशियन निर्वासित होते. रशिया युद्धभूमीवर उभा होता तेव्हा फेब्रुवारी 1943 ला हवाई हल्ले टाळण्यासाठी इमरलिनचे पालक बॉम्ब शेल्टरमध्ये लपले, तिथेच इमरलिनचा जन्म झाला. 

जागतिक बँकेचे युक्रेनला 72 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूरदरम्यान, युक्रेनच्या मदतीसाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला आहे. वर्ल्ड बँकेने युक्रेनला 72 कोटी 30 लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाleonardo dicaprioलिओनार्डो डिकैप्रियो