Russia Ukraine War: राष्ट्रपती पुतिन यांना अटक करा; उद्योगपतीची रशियन सैन्याला कोट्यवधींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:43 AM2022-03-03T07:43:25+5:302022-03-03T07:44:02+5:30

रशियन नागरीक असल्याने हे माझं कर्तव्य आहे की रशियाला नाझीवाद आणि त्याच्या प्रभावापासून अलिप्त ठेवणं. मी यूक्रेनची मदत करणार असल्याचं त्या व्यक्तीने सांगितले.

Russia Ukraine War: To Arrest President Vladimir Putin; Businessman offers billions to Russian troops | Russia Ukraine War: राष्ट्रपती पुतिन यांना अटक करा; उद्योगपतीची रशियन सैन्याला कोट्यवधींची ऑफर

Russia Ukraine War: राष्ट्रपती पुतिन यांना अटक करा; उद्योगपतीची रशियन सैन्याला कोट्यवधींची ऑफर

Next

मॉस्को – गेल्या ८ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करून ताबा घेतला आहे. परंतु अद्याप राजधानी कीव रशियाच्या ताब्यात आली नाही. मात्र कीववर आक्रमक हल्ला करून रशिया लवकरच राजधानीही ताब्यात घेईल अशी शक्यता आहे. रशियानं कीवमधील संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीजवळ स्फोट घडवले आहेत. त्याठिकाणी एका बांगलादेशी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.

अशातच स्वत:ला रशियन उद्योगपती म्हणवणाऱ्या व्यक्तीनं राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांना अटक करणाऱ्याला साडे सात कोटी रुपये इनाम देण्याची ऑफर दिली आहे. या व्यक्तीचं नाव एलेक्स कोनानीखिन (Alex Konanykhin) असं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे जी सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पुतिन यांचा फोटोही लावला आहे. त्यावर जिवंत अथवा मृत असं लिहिण्यात आले आहे.

या व्यक्तीनं पोस्टमध्ये लिहिलंय की, जो कोणता अधिकारी आपल्या संविधानिक पदाचं पालन करेल आणि पुतिन यांना एक युद्धाचा गुन्हेगार म्हणून रशिया तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत अटक करेल. मी त्या अधिकाऱ्याला १ लाख डॉलर इनाम देईल. एलेक्स कोनानीखिननं ही पोस्ट लिंक्डिनवर लिहिली होती. एवढ्याच पोस्टवर तो थांबला नाही तर पुतिन रशियाचे राष्ट्रपती नाहीत. त्यांनी स्पेशल ऑपरेशनअंतर्गत रशियातील अनेक अपार्टमेंट, बिल्डिंग उडवल्या होत्या. त्यानंतर इलेक्शन घेतले नाही. कायद्याचं पालन केले नाही. तसेच त्यांनी विरोधकांच्या हत्या केल्या असाही आरोप त्या व्यक्तीनं लावला आहे. रशियन नागरीक असल्याने हे माझं कर्तव्य आहे की रशियाला नाझीवाद आणि त्याच्या प्रभावापासून अलिप्त ठेवणं. मी यूक्रेनची मदत करणार असल्याचं त्या व्यक्तीने सांगितले.

कोण आहे Alex Konanykhin?

एलेक्स कोनानीखिन आणि रशियन सरकार यांच्यात नेहमी वादंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९६ च्या वॉश्गिंटन पोस्टच्या एका आर्टिकलनुसार, एलेक्सने मॉस्कोच्या फिजिक्स एँड टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे. परंतु त्यांच्या शिक्षणावर बंदी आणली गेली. त्यानंतर त्यांनी स्टूडंट कन्स्ट्रशन कोऑपरेटिव्हची सुरुवात केली. त्यानंतर बँकिंग, स्टॉक्स, रिअल इस्टेटसारखे अनेक उद्योग त्यांनी केले. वयाच्या २५ वर्षापर्यंत त्यांच्याकडे १०० फर्म होत्या. १९९२ मध्ये त्यांच्या कंपन्यांची कमाई २२ अब्ज रूपयांहून अधिक होती. रशियाचे राष्ट्रपती बोरिय येल्तिसिन यांच्यासोबत वॉश्गिंटनला जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता. परंतु १९९६ मध्ये त्यांना आणि त्यांची पत्नी दोघांना व्हिसा फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती.  

Web Title: Russia Ukraine War: To Arrest President Vladimir Putin; Businessman offers billions to Russian troops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.