रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्या घटनेला आज १६५ दिवस होत आले आहेत. एक-दोन दिवसांत युक्रेन झुकेल अशा अविर्भावात असलेल्या पुतीन यांना आज मोठा धक्का बसला आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियातून एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये रशियन नौदलाचा मोठा तळच युक्रेनी सैनिकांनी उडवून दिल्याचे दिसते आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने नोवोफ़ेडोरिव्का गावाजवळील रशियाच्या नौदलाच्या हवाई तळावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. साकी एअरबेसवर मोठा स्फोट झाला आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीनला झाली आहे. या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाल्याचा दावा रशियाने केला आहे. तर मीडियानुसार एकाचा मृत्यू झाला आहे.
फोटोतून स्फोटाची तीव्रता दिसत आहे. हा एक स्फोट नसून स्फोटांची मालिकाच या बेसवर घडविण्यात आलाचा दावा आंतरराष्ट्रीय मीडिया करत आहे. रशियन मंत्रालयानुसार या हल्ल्यात कोणतेही विमान उद्ध्वस्त झालेले नाही.
आग विझवण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. स्फोटांचे कारण शोधले जात आहे. एअरफील्डमध्ये दारूगोळ्याचा साठा होता, त्याच्यापर्यंत स्फोटाची तीव्रता पोहोचली नसल्याचा दावा केला जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार या स्फोटांमागे युक्रेनी सैन्याचा हात आहे. तर कीवने हा दावा फेटाळला आहे.
अधिकाऱ्याने संवेदनशील लष्करी बाबींवर चर्चा करताना दावा केला की, हा रशियन नौदलाचा विमानतळ होता. तेथून युक्रेनवर हल्ले करण्यासाठी लढाऊ विमाने, बॉम्बर नियमित झेपावत होती. या हवाई तळावर हल्ला करण्यासाठी जी शस्त्रास्त्रे वापरली गेली, ती युक्रेनमध्ये तयार करण्यात आली होती.