Russia Ukraine War: रशियाचं एसयू-२५ विमान पाडलं; युक्रेनचा दावा, युद्ध आता चिघळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:55 PM2022-03-04T16:55:51+5:302022-03-04T22:44:02+5:30
रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रसिशाचे एसयू-२५ विमान पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने आज आणखी एक रशियन एसयू-२५ युक्रेनच्या व्होल्नोवाखाजवळ खाली पाडण्यात आले, असे नेक्टा टीव्हीने म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Another #Russian Su-25 was shot down near #Volnovakha.
— NEXTA (@nexta_tv) March 4, 2022
The pilot is wanted. He will have to answer for the fact that he shelled residential houses and civilian infrastructure. pic.twitter.com/GY2K3tQMah
रशिया आणि युक्रेनमधलं युद्धा आणखीच विद्ध्वंसक होत आहे. रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर युरोपपासून अमेरिकेपर्यंत खळबळ माजली आहे. ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. रशियन सैन्याने झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर जोरदार हल्ला केला. यानंतर प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्राला आग लागली. हल्ल्यात प्लांटच्या युनिट १च्या रिअॅक्टर कम्पार्टमेंटचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या प्रकल्प कार्यान्वित नाही परंतु आत न्यक्लिअर फ्यूअल असल्याची माहिती आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.
दरम्यान, रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत. सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.
'...तर तो आपल्या सर्वांचा अंत असेल, अन् युक्रेन काय संपूर्ण युरोपचा अंत होईल'; झेलेन्स्कींचा इशारा https://t.co/vrC7Er1YvZ#RussianUkrainianWar
— Lokmat (@lokmat) March 4, 2022