रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. दिवसागणिक परिस्थिती अत्यंत भीषण होत आहे. याच दरम्यान युक्रेनची चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. गेल्या 31 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान युक्रेनमधील अनेक शहरं ही उद्ध्वस्त झाली आहे. खारकीव्हमध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, रशिय़न सैन्याने मारियुपोल थिएटरवर केलेल्या एअक स्ट्राईकमध्ये जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युक्रेनमध्ये आता खाण्याचं संकट देखील उभं राहिलं आहे.
रशियाने सर्वात जास्त कीव्ह आणि खारकीव्हला टार्गेट केलं आहे. त्यामुळेच आता खारकीव्हची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. लोक अन्नासाठी मोठमोठ्या लाईनमध्ये उभे आहेत. सातत्याने बॉम्बस्फोट असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमी सैनिक आणि सामान्य नागरिकांमुळे रुग्णालये देखील खचाखच भरलेली पाहायला मिळत आहेत. खारकीव्हमधील हन्ना स्पित्स्याना नावाची मुलगी युक्रेनी रेड क्रॉसच्या मदतीन लोकांपर्यंत अन्न पोहचवत आहेत. अनेक लोकांकडे खाण्यासाठी देखील अन्न नाही.
वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असून त्यांना डायपर, चादर आणि जेवण या गोष्टींची आवश्यकता असल्याची माहिती हन्नाने दिली आहे. जेवण मिळावं म्हणून लोकांनी भलीमोठी लाईन लावली आहे. मात्र खूप तास वाट पाहिल्यावर पनीरचा फक्त एक छोटासा तुकडा मिळत आहे. लोक लगेचच मिळत असलेलं सामान घेऊन पुन्हा आपल्या घरामध्ये लपतात असं देखील हन्नाने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाच्या लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाने आता युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सेनेकडून या शहरात रशियन लष्कर असलेल्या ठिकाणांवर टँकच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले.
युद्ध पेटलं, मारियुपोल हादरलं! रशियाकडून 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर; युक्रेनचा गंभीर आरोप
युक्रेनियन सेनेच्या तुकडीच्या या हल्ल्यापूर्वी काही तास अगोदर रशियन सेनेनं मारियुपोल स्थित युक्रेनियन सेनेची अनेक तळ उद्ध्वस्त केले. या घटनेची ड्रोननं टिपलेले काही फोटोही समोर आले आहेत. रशियानं युक्रेनला उद्ध्वस्त केल्याचा दावा मीडियाने सॅटेलाईट फोटो जाहीर करत केला आहे. तर दुसरीकडे, रशियाने युद्धादरम्यान फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. फॉस्फरस बॉम्बच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा तत्काळ मृत्यू संभावतो. याचे घातक कण हे मानवी शरीरात प्रवेश करतात.