Russia Ukraine War : "विजय तुमच्यासाठी बेस्ट गिफ्ट असेल", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली जखमी सैनिकांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:08 PM2022-03-14T16:08:46+5:302022-03-14T16:24:42+5:30
Russia Ukraine Conflict : वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांना 'युक्रेनचे नायक' म्हणून घोषित केले.
रशियासोबतच्या युद्धाच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की आपल्या सैन्याला आणि देशातील जनतेला सतत प्रेरित करत आहेत. त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणे. आपल्या भाषणाने, संघप्रमुखाप्रमाणे आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता इत्यादींनी ते जगभरातील लोकांची मने जिंकत आहेत. अलीकडेच, त्यांनी असे काही केले की त्यांच्या देशाच्या आणि सैन्याच्या हृदयात पुन्हा एकदा नायक म्हणून उदयास आले आहेत.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की रशियन हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना भेटण्यासाठी कीव्ह भागातील लष्करी रुग्णालयात पोहोचले. येथे वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांना 'युक्रेनचे नायक' म्हणून घोषित केले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या रुग्णालय भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ते एका सैनिकासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. यावेळी त्यांनी त्या सैनिकाला प्रोत्साहनही दिले.
Президент України Володимир Зеленський відвідав у госпіталі поранених захисників України 🇺🇦
— Defence of Ukraine (@DefenceU) March 13, 2022
🔊 «Хлопці, швидше одужуйте. Вірю: найкращим подарунком до вашої виписки буде наша спільна перемога!» - зазначив @ZelenskyyUapic.twitter.com/lHYZJHWvp8
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की म्हणाले, "मित्रांनो, लवकर बरे व्हा, मला विश्वास आहे की तुम्ही जे काही केले आहे, त्याची सर्वोत्तम भेट हा आमचा विजय असेल." दरम्यान, हे रुग्णालय कोणते आहे याची पुष्टी झालेली नाही. तसेच, वोलोदिमीर जेलेन्स्की हे रुग्णालयात जातानाचे काही व्हिडिओ व्हायरल देखील होत आहेत.
सोशल मीडियावर कौतुक!
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांची युद्धाच्या काळात देश वाचवण्यासाठी सुरू असलेली तळमळ पाहून सोशल मीडियावर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "हे नेतृत्व सर्वोत्कृष्ट आहे." तर एका अमेरिकन यूजरने लिहिले की, "आमच्याकडे त्यांच्यासारखा राष्ट्राध्यक्ष असायला पाहिजे होता."
1,300 युक्रेनियन सैनिक ठार
दरम्यान, दोन्ही देशांमध्ये 19 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनचे सैनिक कमी संसाधनांवरही रशियाला कडवे आव्हान देत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की स्वतः सैनिकांना आणि देशाला प्रेरित करत आहेत. वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, देशाचे रक्षण करताना किमान 1,300 युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत.