Russia-Ukraine War : कुण्याही मध्यस्थाशी नाही, थेट पुतीन यांच्याशीच बोलणार; झेलेंस्की म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:51 PM2022-05-26T16:51:12+5:302022-05-26T16:51:51+5:30

''युक्रेन आपला भू-भाग सोडणार नाही. आम्ही आमच्या देशात आमच्या भू-भागावर लढत आहोत,'' असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Russia ukraine war Ukraine President Volodymyr Zelensky said i will talk directly to putin not to any mediator  | Russia-Ukraine War : कुण्याही मध्यस्थाशी नाही, थेट पुतीन यांच्याशीच बोलणार; झेलेंस्की म्हणाले...

Russia-Ukraine War : कुण्याही मध्यस्थाशी नाही, थेट पुतीन यांच्याशीच बोलणार; झेलेंस्की म्हणाले...

Next

आपण कुण्याही मध्यस्थासोबत नाही, तर केवळ राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच बोलू, असे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी बुधवारी म्हटले आहे. ते दावोस येथे वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये प्रेक्षकांशी बोलत होते. 

झेलेन्स्की म्हणाले, जर पुतिन यांना वास्तव समजत असेल, तर ते संघर्षातून राजनैतिक मार्ग काढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर युक्रेन जोवर आपला भू-भाग परत मिळवत नाही, तोवर लढत राहील. खरे तर, मॉस्कोने आपले सैन्य मागे घ्यायला हवे. हेच चर्चेच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल असू शकते, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

दावोस येथे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) बैठकी दरम्यान, ''युक्रेनियन ब्रेकफास्ट''मध्ये व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झालेले झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनमध्ये काय सुरू आहे, हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना पूर्णपणे समजत आहे, यावर आपला अजिबात विश्वास नाही. 

यावेळी, संघर्ष संपवण्यासाठी चर्चा शक्य आहे? असा प्रश्न 'सीएनएन' च्या फरीद जकारिया यांनी केला असता, ''युक्रेन आपला भू-भाग सोडणार नाही. आम्ही आमच्या देशात आमच्या भू-भागावर लढत आहोत,'' असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Web Title: Russia ukraine war Ukraine President Volodymyr Zelensky said i will talk directly to putin not to any mediator 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.