Russia Ukraine War: युक्रेनला आणखी घातक शस्त्रास्त्रे मिळणार; जेलेन्स्की यांच्या भाषणानंतर अमेरिकेची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:19 AM2022-03-17T08:19:33+5:302022-03-17T08:19:56+5:30
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. रशियाचे हल्ले मंदावल्याने युक्रेनने बचावाचा पवित्रा बदलला असून रशियन फौजांनी ताब्यात घेतलेली शहरे पुन्हा मिळविण्यासाठी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अशातच रशियाचा शस्त्रसाठा संपत आला आहे. यामुळे रशियावर मोठी नामुष्की ओढविण्याची वेळ असताना अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला आणखी घातक शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे. आम्ही युक्रेनला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण दिवसात लढण्यासाठी आणि आपले संरक्षण करण्यासाठी शस्त्रास्त्रे देत आहोत. यामध्ये विमान रोधी वाहन, शस्त्रे आणि ड्रोन पाठविले जाणार आहेत, असे ते म्हणाले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. याचबरोबर आपल्या देशावर नो फ्लाय झोन करण्याची आपली मागणी चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले. रशियाच्या खासदारांवर अवश्य प्रतिबंध लावावेत तसेच रशियाहून आयात थांबविली पाहिजे., असे ते म्हणाले. याच्या काही तासांनी बायडेन यांनी युक्रेनला आणखी मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली.