शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

Russia Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा रशियाने केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 2:10 PM

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे.

मॉस्को -  रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे. गुरुवारी रशियाने  दावा केला की, युक्रेनी सैन्याची दोन हेलिकॉप्टर त्यांच्या सीमेमध्ये घुसली आणि त्यांनी नागरी वस्तीवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनने असा कुठलाही हल्ला केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.रशियाने युक्रेनच्या सीमेच्या शेजारी असलेल्या बेलगोरोड आणि ब्रयान्स्कमध्ये हल्ला होण्याचा दावा केला आहे.

रशियाने बेलगोरोड आणि ब्रयान्स्क येथे हल्ला झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी युक्रेनने बेलगोरोडमध्ये रेल्वे ब्रिजवर हल्ला झाल्याचा दावा केला होता. बेलगोरोडचे महापौर व्याशेसलेव्ह ग्लादकोव्ह यांनी दावा केली की या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तर केवळ रेल्वे ब्रिजला नुकसान झाले आहे. ज्या ब्रिजचे नुकसान झाले आहे, ते युक्रेनमधील डोनबास प्रांतापासून ६.५ किमी दूर अंतरावर आहे. रशियासाठी हा ब्रिज खूप महत्त्वाचा होता. कारण त्यावरून लष्करी सामुग्रीचा पुरवठा होत होता.

बेलगोरोडमध्ये युक्रेनकडून या महिन्यात झालेला दुसरा हल्ला आहे. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातील बेलगोरोडमधील तेल डेपोवर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनवर केला होता. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला होता. रशियाने युक्रेनच्या सैन्यावर ब्रायान्स्कमधील एका गावावर एअरस्ट्राईक केल्याचा आरोप केला आहे. रशियाचा दावा आहे की, युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी ब्रायान्स्क आणि क्लिमोवोच्या गावातील रहिवासी भागांमध्ये एअरस्ट्राईक केली. ब्रायान्स्क हे युक्रेनच्या सीमेपासून ५५ किमी अंतरावर आहे.

रशियाच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटीने एक पत्रक प्रसिद्ध करून दावा केला की, गुरुवारी युक्रेनच्या दोन लढाऊ हेलिकॉप्टर्सनी बेकायदेशीरपणे रशियाच्या एअरस्पेसमध्ये घुसून हल्ला केला. क्लिमोवेच्या गावातील इमारतींवर किमान ६ हवाई हल्ले केले. य हल्ल्यात सहा इमारतींचे नुकसान झाले असून, किमान ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा एक गर्भवती आणि वयस्करांचा समावेश आहे.

या हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनला धमकी दिली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आमच्या हद्दीत युक्रेनी सैनिकांनी घुसखोरी करून मोडतोड आणि हल्ले केले. जर असेच चालू राहिले तर आम्ही युक्रेनच्या किव्ह कमांड सेंटरवर हल्ला करू. आतापर्यंत आम्ही हे टाळले होते. किव्हच्या याच कमांड सेंटरमधून युक्रेनचे सैन्य आपली रणनीती आखत असते.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध