रशियाला निडरपणे सामोरं गेले, तरी जेलेन्स्की यांची खुर्ची जाणार? नव्या नावाचा विचार सुरू; असं का? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:58 AM2022-11-23T11:58:48+5:302022-11-23T12:00:14+5:30
रशिया-युक्रेन युद्धात आता मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. रशिया विरुद्धच्या युद्धात निडरपणे सामोरे गेलेले यु्क्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की
रशिया-युक्रेन युद्धात आता मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. रशिया विरुद्धच्या युद्धात निडरपणे सामोरे गेलेले यु्क्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना आता खुर्चीवरून पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे. रशियासारख्या बड्या देशाच्या आगळीकीला मोठ्या हिमतीनं सामोरं जाऊनही जेलेन्स्की यांना पर्याय का शोधला जात आहे असा विचार अनेकांना पडला आहे. पण समोर आलेली माहिती खरी असून युक्रेनमध्ये जेलेन्स्की यांच्या पर्यायावर गांभीर्यानं विचार केला जात आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची अमेरिका आणि युरोपीय संघाची भावना झाली आहे. शांतता चर्चेसाठी पाश्चिमात्य देशांकडून पाठवण्यात येणाऱ्या अनेक सूचनांकडे जेलेन्स्की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप केला जात आहे. चर्चेसाठी अजिबात जागा निर्माण होऊ शकत नाही अशा जाचक अटी जेलेन्स्की लादत आहेत. याशिवाय जेलेन्स्की हे युद्ध आणखी वाढवू इच्छित आहेत आणि त्यांना नोटालाही थेट सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं अमेरिकेचं मत झालं आहे.
नव्या राष्ट्रपतीसाठी ही तीन मोठी नावं चर्चेत
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या स्पेशल टीमला भीती आहे की जेलेन्स्की कधीही रशियाशी दोन हात करू शकतात, ज्यासाठी ते अद्याप तयार नाहीत. पोलंडमध्ये क्षेपणास्त्र पडण्याच्या घटनेमुळेही जेलेन्स्कींचा पर्याय लवकरात लवकर आणला गेला पाहिजे असं अमेरिकेचंही मन बनलं आहे.
वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या जागी युक्रेनच्या नवीन राष्ट्राध्यक्षांसाठी अशा नावांचा विचार केला जात आहे की ज्यांना युक्रेनची जनता सहज स्वीकारेल. सध्या, जेलेन्स्की यांची जागा घेऊ शकतात अशा संभाव्य उमेदवारांमध्ये युक्रेनच्या सशस्त्र दलाचे कमांडर-इन-चीफ व्हॅलेरी झल्जानी यांचं नाव आघाडीवर आहे. तर युक्रेनच्या वर्खोव्हना राडाचे माजी अध्यक्ष दिमित्री रझुमकोव्ह यांचंही नाव चर्चेत आहे. तसंच अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख आंद्रेई एर्माक यांच्याही नावाचा विचार केला जात आहे.