Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 09:31 PM2022-03-20T21:31:20+5:302022-03-20T21:31:42+5:30

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे.

Russia Ukraine War Ukrainian President Zelensky says we are ready for talks with Putin regarding peace talks | Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान!

Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान!

googlenewsNext

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेन रशियासोबत करार करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. आम्ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की म्हणाले आहेत. चर्चा करण्यास नकार देणं म्हणजे हे तिसऱ्या महायुद्धाचं लक्षण ठरू शकतं, असं जेलेन्स्की म्हणाले. रशियन सैन्य युक्रेनमधील निवासी भागांना सतत लक्ष्य करत आहे. रशियन हल्ल्यामुळे युक्रेन जवळजवळ उद्ध्वस्त झाले आहे. पण युक्रेनचं सैन्य हार मानायला तयार नाही. युक्रेनचं सैन्य खंबीरपणे रशियन सैनिकांना तोंड देत आहे. 

दोन्ही देशांमधील हे युद्ध कधी संपेल हे सांगणे कठीण असले तरी या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवारी केलेल्या दाव्यानुसार 20 मार्चपर्यंत 14,700 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या युद्धात आतापर्यंत रशियाची अनेक शस्त्रं नष्ट झाली आहेत. 118 रशियन हेलिकॉप्टर, 96 विमानं आणि 476 रणगाड्यांसह अनेक शस्त्रं नष्ट करण्यात आल्याचा दावा मंत्रालयानं केला आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, परंतु युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, युक्रेनमधील युद्धामुळे आतापर्यंत 65 लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे.

जेलेन्स्की यांनी केलं शांतता आणि सुरक्षेच्या चर्चेचं आवाहन
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी शनिवारी रशियासोबत शांतता आणि सुरक्षा चर्चेसाठी आवाहन केलं होतं. रशियाला आपल्या चुकांमुळे होणारे नुकसान मर्यादित करण्याची ही एकमेव संधी आहे, असं जेलेन्स्की म्हणाले होते. युक्रेनच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी करणार्‍या रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणाले की, दोन्ही बाजू युक्रेनच्या तटस्थ स्थितीबाबत कराराच्या जवळ आहेत. युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याच्या आणि तटस्थ भूमिका घेण्याच्या प्रयत्नांवरून दोन्ही बाजू मतभेद दूर करण्याच्या जवळ जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जेलेन्स्कीचे कौतुक केले
युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाईदरम्यान व्लादिमीर जेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबाला ब्रिटनमध्ये आश्रय देण्याची ऑफर दिली आहे, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले. जेलेन्स्कीचे खूप चांगले व्यक्ती आहेत, परंतु ते देशासाठी एक प्रेरणास्रोत म्हणूनही सिद्ध झाले आहेत, असा कौतुकाचा वर्षाव देखील जॉन्सन यांनी केला होता. 

Web Title: Russia Ukraine War Ukrainian President Zelensky says we are ready for talks with Putin regarding peace talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.