Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी होत आहे. परंतु या युद्धातून अजूनही रशियाला काहीही साध्य झालेलं नाही. परंतु आता रशियानं हे युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनपुढे काही अटी ठेवल्या आहेत. जर या चारही अटी मान्य केल्या, तर त्वरित युद्ध थांबवलं जाईल, असं रशियानं म्हटल्याचा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केला आहे.
सैन्य कारवाई बंद करारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २४ फेब्रुवारीला जेव्हा युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारलं होतं, तेव्हा आपलं ध्येय हे युक्रेनवर कब्जा करणं नसून डिमिलिटराइज करणं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रशियानं युक्रेनसमोर त्वरीत सैन्य कारवाई बंद करण्याची अट ठेवली आहे.
संविधानात बदलरशिया कायमच युक्रेनच्या कोणत्याही अन्य संघटनेत दाखल होण्यावर नाराजी व्यक्त करत आला आहे. युक्रेन सातत्यानं NATO मध्ये सामिल होण्याचा प्रयत्न करत होता. तसंच आता युक्रेननं तटस्थ राहण्यासाठी आपल्या संविधानात बदल करावा असं रशियाचं म्हणणं आहे. त्यानंतर युक्रेनला NATO आणि EU मध्ये सामिल होणं अशक्य होईल.
क्रिमियाला मान्यता युक्रेननं क्रिमियाला रशियाचा भाग म्हणून मान्यता द्यावी अशी तिसरी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. क्रिमिया हा यापूर्वी रशियाचाच भाग होता. परंतु १९५४ मध्ये तत्कालिन सोव्हिएत संघाचे नेता निकिता ख्रुश्चेव यांनी तो युक्रेनला भेट म्हणून दिला होता. परंतु मार्च २०१४ मध्ये हल्ला करत रशियानं क्रिमिया पुन्हा रशियाच्या ताब्यात घेतला. परंतु युक्रेन त्याला मान्यता देत नाही.
डोनेत्स्क-लुहांस्क स्वतंत्र देश माना२०१४ मध्ये युक्रेनमधील डोनबास प्रांतातील डोनेत्स्क-लुहांस्कना फुटीरतावाद्यांनी स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं. युक्रेनसोबत युद्ध सुरू होण्याचा काही दिवसांपूर्वीच रशियानं डोनेत्स्क-लुहांस्कना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. परंतु युक्रेननं याचा विरोध केला होता.