Russia-Ukraine War : युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची घोषणा; रशिया भडकला, दिला असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:04 AM2022-06-02T02:04:30+5:302022-06-02T02:10:45+5:30
रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव नाही. यातच आता अमेरिकेने युक्रेनला अत्याधुनिक मिसाइल सिस्टम आणि इतरही काही शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेनेनंतर रशिया जबरदस्त भडकला असून, अमेरिका आगीत तेल टाकत असल्याचे रशियाने म्हटले आहे.
रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम युक्रेनला देण्यात येईल, अशी पुष्टी यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने केली आहे.
अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका -
अमेरिकेच्या या घोषणेनंतर, युक्रेनला अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्यास थेट अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका वाढेल, असा इशारा रशियाने दिला आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या सुरू असलेल्या अथवा वाढणारा पुरवठ्यामुळे धोका अधिक वाढेल, असे रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव यांनी आरआयए नोवोस्ती या वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे.
शस्त्रास्त्रे पुरविण्याची अमेरिकेची घोषणा -
रायबकोव्ह हे, मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात थेट सामना होण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. यावेळी, अमेरिका रशियाविरुद्ध युद्ध करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. लढाईमध्ये युक्रेन कायम रहावा आणि हा रशियाचा सामरिक पराभव सांगता यावा, असे अमेरिकेला वाटते. पण हे धोकादायक आहे, अशेही रायबकोव्ह यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती ज्यो बायडेन प्रशासनाने मंगळवारी, युक्रेनला मध्यम पल्याची रॉकेट सिस्टिम देण्याची घोषणा केली आहे.