Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:04 AM2022-03-04T09:04:41+5:302022-03-04T09:05:35+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी युक्रेनच्या (Ukraine) समर्थनार्थ रशियावर (Russia) निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी युक्रेनच्या (Ukraine) समर्थनार्थ रशियावर (Russia) निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी, आपल्या नवीन निर्बंधांमध्ये, अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रेस सेक्रेटरी पेस्कोव्ह यांच्यासह १९ रशियन दिग्गज आणि त्यांच्याशी संबंधित ५० लोकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. हे सर्वजण पुतिन यांचे खास मानले जातात.
रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अलीशेर बुर्हानोविच उस्मानोव्ह, तसंच १९ रशियन उच्चभ्रू व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील लोक, तसंच जवळच्या सहकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लादले असल्याची माहिती न्यूज एजन्सी एएफपीनं दिली. व्हिसा निर्बंधांनंतर आता त्यांन अमेरिकेला जाता येणार नाही. याशिवाय अमेरिकेने विमान कारखाने Irkutsk आणि Aviastar या विमान कारखान्यांसह अनेक रशियन विमान उत्पादक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.
In my State of the Union Address, I said the United States is going after the crimes of Russian oligarchs.
— President Biden (@POTUS) March 3, 2022
Today, we’re adding dozens of names to the list — and banning travel to America by more than 50 Russian oligarchs, their families, and close associates.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंत्रिमंडळ आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या निर्बंधांचा उल्लेख केला. तसंच तसंच आपलं ध्येय रशियावर अधिक दबाव टाकणं आणि अमेरिका, तसंच सहकारी देशांना होणारं नुकसान कमी करणं हेच असल्याचं त्यांनी नमूद केलं. या निर्णयामुळे रशियातील व्यवसायिक आणि त्यांचे कुटुंबीय अमेरिकन आर्थिक प्रणालीपासून दूर होतील असं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं. त्यांची अमेरिकेतील संपत्ती फ्रीज करण्यात आली असून त्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
प्रवक्ते पेस्कोव्ह यांच्यावर निर्बंध
अमेरिकेने रशियन संरक्षण मंत्रालया क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांच्यावर निर्बंध लादले आहेत. तर दुसरीकडे रशियन दिग्गज उद्योगपती उस्मानोव्ह आणि इतरांच्या संपत्तीचा अमेरिका आणि अमेरिकन लोकांद्वारे वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तेत सुपरयॉटचा समावेश आहे. तसंच ही जगातील सर्वात मोठी क्रूझ आहे, परंतु ती जर्मनीने नुकतीच जप्त केली होती. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी मालकीच्या विमानांपैकी एक असलेल्या उस्मानोव्हच्या खासगी जेटचाही या निर्बंधांमध्ये समावेश आहे.