पुतिन यांनी युद्धाच्या मैदानात उतरवला ‘बाहुबली', NATO नं दिलंय 'सैतान' असं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:37 PM2023-09-05T18:37:55+5:302023-09-05T18:39:59+5:30
खतरनाक आहे रशियाचं हे हत्यार...!
युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून सतत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पाश्वभूमीवर आता रशियाने आपले शक्तिशाली शस्त्र मैदानात उतरवले आहे. रशियावने आता अत्यंत घातक मानली जाणारी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) यंत्रणा तैनात केली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा हा निर्णय गेम-चेन्जर मानला जात आहे. रशिन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसचे प्रमुख यूरी बोरिसोव्ह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रशियाची ही मिसाइल यंत्रणा बॉम्ब हल्ल्याचीही क्षमता ठेवते. या क्षेपणास्त्र प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, याचा लहान प्रारंभिक प्रक्षेपण टप्पा, यामुळे सर्व्हिलान्स सिस्टिमला हे ट्रॅक करण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. यामुळे विरोधी देशाला याचा हल्ला रोखणे जवळजवळ अशक्य होते.
एकाचवेळी 15 अणवस्त्र हल्ले करण्यास सक्षम -
स्पुतनिक न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आरएस-28 ही रशियाची पुढील पीढीतील इंटर इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल सिस्टिम आहे. जी देशासाठी सायलो आधारित धोरणात्मक संरक्षणाचा कणा बनण्यास पूर्णपणे तयार आहे. ही मिसाइल सिस्टिम जगातील सर्वात घातक अण्वस्त मिसाइल पैकी एक आहे. ही बॅलेस्टिक मिसाइल प्रणाली 15 अण्वस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. हिचा उद्देश आर-36 आयसीबीएमला पुणरस्थापित करणे आहे. नाटो देशांमध्ये हिला इंग्रजी शब्द SATAN नावाने ओळखले जाते. याचा मराठीत अर्थ सैतान असा होतो.
युक्रेन युद्ध सुरू होऊन दीड वर्षांहूनही अधिकचा काळ लोटला आहे. या युद्धात युक्रेनला मोठा फटका बसला असला तरी, रशियाचेही बरेच नुकसान झाले आहे. ही मिसाइल सिस्टिम केवळ डिफेन्स म्हणून लावण्यात येईल. जेणेकरून विरोधी देश हल्ला करण्यापूर्वी चार वेळा विचार करतील, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.