शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

व्लादिमीर पुतिन पुन्हा आक्रमक मोडवर? रशियानं युक्रेनवर डागले 100 मिसाइल्स; झेलेन्स्की यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 4:46 PM

Russia Ukraine War: महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर रशियाने हा हल्ला केला आहे...

यूक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला केला असून 100 मिसाइल्स डागले आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, रशियाने सोमवारी (26 अगस्त, 2024) रात्री युक्रेनमध्ये पॉवर ग्रिडला निशाना बनवत मोठ्या प्रमाणावर मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे की, त्यांनी देशातील जवळपास सर्व भागांना निशाणा बनवत डझनावर मिसाइल्स आणि ड्रोनची माहिती मिळवली आहे. यात खार्किव आणि द्निप्रोच्या पूर्वेकडील भागापासून दक्षिणेकडील बंदराचे शहर ओडेसा आणि राजधानी कीवचाही समावेश आहे. 

"रशियन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पॉवर ग्रीड्सना लक्ष्य केले" -दरम्यान, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्म्यहाल यांनी सोमवारी टेलीग्रामवर लिहिले आहे, "रशियन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पॉवर ग्रीड्सना लक्ष्य केले आहे. तसेच, ड्रोन, क्रूझ मिसाइल आणि हायपरसोनिक मिसाइल्ससह किमान 15 भागांना निशाणा बनवले आहे.

मोदींच्या दौऱ्यानंतर रशियाचा हल्ला - महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर रशियाने हा हल्ला केला आहे. मोदी पोलंड वरून ट्रेनने कीवला पोहोचले होते. येथे त्यांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी, दोन्ही देशांनी एकत्रितपणे या संघर्षावरील समाधान शोधावे, अशी आपली इच्छा असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी चर्चेवर अधिक भर दिला होता. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन