शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Russia Ukraine War: रशियाविरोधी देशांवर कठोर कारवाईच्या विचारात व्लादिमीर पुतीन, दिले यादी तयार करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 4:36 PM

Russia Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कठोर  कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. तसेच अशा देशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे.

मॉस्को - युक्रेनविरोधातील आपले आक्रमण रशियाने अधिकच तीव्र केले आहे. दरम्यान, युक्रेन युद्धात रशियाविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कठोर  कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. तसेच अशा देशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी पुतीन यांनी एका विशेष ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. तसेच ८ मार्चपासून रशियामधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. प्रवासी आणि मालवाहू विमानांची सेवा रोखण्याचे आदेश दिले आहेत. पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या अझरबैजान, अर्मेनिया, कझाकिस्तान, कतर, यूएई आणि तुर्कीच्या मार्गातून रशियन नागरिक माघारी परतत आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इशार देताना सांगितले की, युक्रेनचा देशाचा दर्जा धोक्यात आले. तसेच पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेले निर्बंध म्हणजे रशियाविरोधात करण्यात आलेल्या युद्धाची घोषणा आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ताब्यात आलेल्या मारियुपोलमध्ये दहशतवादी कारवायांमुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे,

यादरम्यान युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, शनिवारी रशियन सैन्याने मरियुपोलमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. रशियन सैन्य किव्ह आणि उत्तरेकडील चेरनीहीव्हमधील निवासी भागात शक्तिशाली बॉम्ब टाकत आहे. दरम्यान पुतीन यांनी सांगितले की, युक्रेन जे काही करत आहे, ते त्यांनी सुरू ठेवले तर मी युक्रेनच्या देश म्हणून असलेल्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आवाहन करेन.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱ्या आणि रशियाचे चलन कमकुवत करण्यासाठी लावण्यात येत असलेल्या निर्बधांवरून पाश्चात्य देशांवर टीका केली आहे. पुतीन यांनी रशियन विमान कंपनी एअरोफ्लोटच्या फ्लाइट अटेंडंटसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, लावण्यात येत असलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत. तसेट युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, रशियन तोफखाना आणि विमानांनी बॉम्फफेक करून बाहेर जात असलेल्या लोकांना अडथळा निर्माण केला. दरम्यान, युद्धकाळात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये दोन फेऱ्यांमधील चर्चा झाली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या फेरीतील चर्चा ही सोमवारी होणार आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीय