Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:28 IST2025-01-15T18:09:17+5:302025-01-15T18:28:12+5:30
Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर सतत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन सरकारने वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय?
Russia Ukraine War : गेल्या काही वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव सुरु आहे. या दोन्ही देशातील युद्ध आणखी वाढतच आहे. मंगळवारी युक्रेनने रशियावर २०० हून अधिक ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर ८० हल्ले केले. युक्रेनच्या हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. रशियाच्या हल्ल्यातून लोकांना वाचवण्यासाठी युक्रेनने देशातील वीड खंडीत केली आहे.रशियाच्या हल्ल्यापासून लोकांना वाचवण्यासाठी युक्रेनच्या अनेक शहरातील वीड खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताशी पंगा घेतला, पाकिस्तान, चीनसारखी हालत होणार; बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री भारताकडे वळणार
हरमन हलुश्चेन्को यांनी फेसबुकवर लिहिले की, "शत्रू युक्रेनियन लोकांना दहशत देत आहे. म्हणून, युक्रेनियन लोकांनी घरीच राहावे. तसेच, सरकारने जारी केलेल्या सल्ल्याचे पालन करा. ऊर्जा कंपनी युक्रेनर्गोने खार्किव, सुमी, पोल्टावा येथे वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. झापोरिझिया, निप्रोपेट्रोव्हस्क आणि किरोव्होह्राड प्रदेशात नोंदवले गेले आहेत.
बुधवारी पहाटे पश्चिम ल्विव्ह प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून रशियन सैन्याने क्षेपणास्त्र हल्ले केले, असे शहराचे महापौर आंद्री सदोवी यांनी सांगितले. "सकाळच्या हल्ल्यादरम्यान परिसरात शत्रूच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही," असे ते म्हणाले. युक्रेनियन हवाई दलाने देशभरात हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला आहे.
रशिया आणि अमेरिकाच सहभागी व्हावेत
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्रेन पुढाकाराचा अभ्यास करण्यास तयार आहे, जे पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. युक्रेनबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुकही केले आहे. तर पुतिन यांचे सल्लागार निकोलाई पात्रुशेव म्हणाले की युक्रेनसंदर्भातील चर्चेत फक्त रशिया आणि अमेरिकाच सहभागी व्हावेत.
शुक्रवारी, रशियाच्या राष्ट्रपती राजवाड्याने, क्रेमलिनने सांगितले होते की मॉस्को पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील बैठकीसाठी तयार आहे. या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल २० जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधीनंतरच उचलता येईल. तर याच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी सांगितले होते की त्यांच्या आणि पुतिन यांच्यात बैठकीचे नियोजन केले जात आहे.