Russia-Ukraine War: मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (volodymyr zelensky) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी भेटून युद्ध संपवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. "मला वाटते की, ज्याने हे युद्ध सुरू केले तोच हे युद्ध थांबवू शकतो," असे जेलेन्स्की म्हणाले.
युक्रेनमधील मेट्रो स्टेशनवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना युक्रेनियन अध्यक्ष म्हणाले की, "रशिया आणि युक्रेनमध्ये शांती परतणार असेल, तर मी पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार आहे. आम्ही तर सुरुवातीपासूनच रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधण्याचा आग्रह धरला आहे. हा संघर्ष राजनैतिक मार्गाने सोडवला जावा अशी आमची इच्छा आहे," असेही ते म्हणाले.
युक्रेनचा रशियाला इशारायावेळी जेलेन्स्की यांनी आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चारही केला. ते म्हणाले की, "रशियाने मारियुपोलच्या काळ्या समुद्रातील बंदरात उरलेल्या युक्रेनियन सैन्यावर हल्ला केला, तर आम्ही चर्चा खंडित करू. मारियुपोलमध्ये आमचे लोक मारले गेले तर, युक्रेन कोणत्याही प्रकारची वाटाघाटी करणार नाही."