युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:18 PM2022-02-25T14:18:32+5:302022-02-25T14:20:30+5:30

एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते.

Russia Ukrian conflict Anonymous declare cyber war against Russia | युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प

युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर झाला मोठा सायबर हल्ला; अनेक सरकारी वेबसाइट्स ठप्प

Next

युक्रेनवर सातत्याने सायबर हल्ले सुरू आहेत. यासाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. मात्र, आता हॅकर्सच्या एका Anonymous गटाने रशियाविरुद्धच सायबर युद्ध सुरू केले आहे. महत्वाचे म्हणजे, रशियन सरकारच्या अनेक वेबसाइट्सना निशाणा करत, त्या बंद केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या गटाला रिप्रझेंट करण्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटने, आपण रशियन सरकारविरुद्ध सायबर-युद्धाची सुरुवात केल्याचे म्हटले आहे. याशिवाय, रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाई केल्याने, आपण रशियाच्या डझनावर वेबसाइट्सना निशाणा बनवून त्या डाऊन केल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते.

या सायबर हल्ल्याशीसंबंधित एका अकाउंटवरून ट्विट करण्यात आले होते, की आम्ही legion आहोत. पुतिन यांच्या काळात ज्या लोकांचा जीव गेला, ते विसरणार नाही. याच्याशीच संबंधित आणखी एका अकाउंटवरून ट्विट करण्यात आले, की पुतिन यांची वेळ संपली, आता या अॅटॅकपासून रिकव्हर करण्यासाठी बराच वेळ लागेल. एका वृत्तानुसार, RT.Com या न्यूज साइटवर रशियन प्रचाराचा आरोप लावत निशाना साधण्यात आला.

Anonymous च्या हॅकर्सनी यापूर्वी अमेरिकन सरकारच्या वेबसाईट्स, सेंट्रल इंटेलीजेंस एजेंसी(CIA), Westboro Baptist Church, ISIS, Church of Scientology आणि Epilepsy Foundation ला 2008 मध्ये टारगेट केले होते. तसेच आपण प्रायव्हसीच्या सुरक्षेसाठी काम करतो, असा दावाही Anonymous ने केला आहे.

Web Title: Russia Ukrian conflict Anonymous declare cyber war against Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.