Vladimir Putin, Russia vs USA America: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांना खुले आव्हान दिले आहे. पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपीय देशांना सज्जड दम भरला. तसेच, आपल्या भाषणात पुतीन यांनी 'नाटो'वरही निशाणा साधला. "पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि इतर देशांशी जे केले, तेच रशियाशी करण्याचा त्यांचा मानस आहे. ते आम्हाला कमकुवत आणि पराभूत राष्ट्रांच्या पंक्तीत बसलेले समजत असतील तर असं आम्ही अजिबात होऊ देणार नाही. रशियन फेडरेशनमध्ये पाश्चिमात्य देशांनी अशीच ढवळाढवळ सुरू केली तर त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल, जी पूर्वीच्या कित्येक काळापेक्षा अधिक वेदनादायी असेल. असे प्रयत्न थांबवले नाहीत तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे पुतीन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
रशियातील अध्यक्षीय निवडणुकीच्या दोन आठवड्यांपूर्वी, फेडरल असेंब्लीला आपल्या भाषणात व्लादिमीर पुतिन म्हणाले की, पाश्चिमात्य देशांना जगाला चिथावणी देण्याची सवय आहे आणि ते सतत जागतिक संघर्ष वाढवत आहेत. त्यांचा उद्देश आमचा विकास थांबवणे आहे. स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'मध्ये सामील झाल्यानंतर, पुतिन यांनी जाहीर केले की रशियन सशस्त्र सेना पश्चिमेकडे अधिक मजबूत केली जाईल. रशियाच्या शत्रूंनी लक्षात ठेवावे की त्यांच्याकडे लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम शस्त्रास्त्रे आहेत.
रशिया युरोपवर हल्ला करू शकतो हे अमेरिकेचे दावा पुतिन यांनी फेटाळून लावला. पुतीन म्हणाले की, अमेरिका देशांना संघर्षासाठी भडकवते, त्यांनी स्वतः युक्रेन, मध्य पूर्व आणि इतर प्रदेशांमध्ये संघर्षाला प्रोत्साहन दिले. रशिया ज्या प्रकारे युरोपवर हल्ला करण्याविषयी बोलतोय तो निव्वळ मूर्खपणा आहे. अमेरिकेने आणखी एक खोटे बोलले आहे, त्यात रशियाने अंतराळात अण्वस्त्रे तैनात केली आहेत असे म्हटले आहे, अमेरिका हे करत आहे कारण आम्ही नेहमीच रशियाशी आमच्या अटींवर बोललो आहे. आम्ही वॉशिंग्टनशी बोलण्यास तयार असलो तरी ते केवळ रशियाच्या हिताच्या अटींवरच असेल.