कीव: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. दोन्ही देशांमधला तणाव कायम आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियाशी दोन हात करत आहे. कीवला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा दिला आहे. यानंतर आता युक्रेनी सैनिकांनी बचावात्मक रणनीती सोडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान सोशल मीडियावर हल्ल्याचा एक लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
युक्रेनच्या चेर्निहाईव शहरात एका कारच्या डॅशबोर्डवर लावलेल्या कॅमेऱ्यात क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरार कैद झाला आहे. कार चालत असताना समोरच असलेल्या एका इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळलं. कानठळ्या बसवणारा आवाज झाला. धुळीचे लोट उठले.
इमारतीखाली तरुण उभा असताना क्षेपणास्त्र हल्लारशियाकडून हल्ले सुरू असताना इमारतीखाली एक तरुण उभा होता. तो व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. तितक्यात इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. त्यानंतर तरुण तिथून पळून गेला. एका छताखाली जात त्यानं आश्रय घेतला. यादरम्यान तरुणानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाबद्दलची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही.
इमारतीखाली तरुण असताना रॉकेट हल्लारशियाकडून हल्ले सुरू असताना इमारतीखाली एक तरुण उभा होता. तो व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. तितक्यात इमारतीवर रॉकेट हल्ला झाला. त्यानंतर तरुण तिथून पळून गेला. एका छताखाली जात त्यानं आश्रय घेतला. यादरम्यान तरुणानं रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाबद्दलची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही.
नेक्स्टा या मीडिया हाऊसनं तरुणानं चित्रित केलेला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. स्वयंसेवक तरुण इमारतीखाली उभा राहून व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसत आहे. तितक्यात एका रॉकेटचा आवाज येतो. तरुण वर पाहतो. थोड्याच वेळात रॉकेट इमारतीवर कोसळतं. जोरदार आवाज होतो.
रॉकेट कोसळताच काचेचे तुकडे खाली पडतात. हे तुकडे तरुणाच्या अंगावर कोसळण्याआधी तो एका छताखाली जातो आणि स्वत:चा जीव वाचवतो. तरुणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.