Russia vs Ukraine War: याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:04 PM2022-03-11T23:04:04+5:302022-03-11T23:04:33+5:30

Russia vs Ukraine War: बंदुकधारी सैनिकांना हाकलून लावणाऱ्या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक; १६ लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला व्हिडीओ

Russia vs Ukraine War Elderly Ukrainian Couple Kick Out Russian Soldiers From Their Yard | Russia vs Ukraine War: याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक

Russia vs Ukraine War: याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक

googlenewsNext

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याचे संकेत मिळत नाहीत. हजारो रशियन सैनिक सध्या युक्रेनमध्ये आहेत. एका वृद्ध दाम्पत्याच्या अंगणात गेलेल्या रशियन सैनिकांवर मोठी नामुष्की ओढावली. त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हातात शस्त्रं असलेले चार रशियन सैनिक एका घराच्या अंगणात शिरले. त्यांना पाहून घरात राहत असलेलं वृद्ध दाम्पत्य बाहेर आलं. हातात कोणतंही शस्त्रं नसलेले पती-पत्नी थेट सैनिकांना भिडले. त्यांनी सैनिकांना अंगण सोडण्यास सांगितलं. हाती शस्त्रं असलेल्या सैनिकांना अंगणातून परतावं लागलं. हा संपूर्ण प्रकार दाम्पत्याच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.

घटनेचा व्हिडीओ बुधवारी समोर आला. आतापर्यंत १६ लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ मायकोलायिव प्रांतातल्या वोझनेसेन्स्क गावातला आहे. व्हिडीओत एकूण चार सैनिक दिसत आहेत. पैकी तीन सैनिक दरवाज्यातून अंगणात शिरले. तर एक जण बाहेरचा थांबला.

युक्रेनी सैनिकांचा शोध घेत अंगणात आलेल्या रशियन सैनिकांना पाहून एक दाम्पत्य बाहेर आलं. दोघेही रशियन सैनिकांवर ओरडले. दाम्पत्याला घाबरवण्यासाठी एका सैनिकानं हवेत गोळीबार केला. पण तरीही दाम्पत्य बधलं नाही. आमच्या मालकीच्या जागेतून बाहेर व्हा, असं म्हणत पती पत्नी सैनिकांवर ओरडले. दाम्पत्याचा आक्रमक अवतार पाहून सैनिक तिथून निघून गेले.

Web Title: Russia vs Ukraine War Elderly Ukrainian Couple Kick Out Russian Soldiers From Their Yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.