Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:57 PM2022-03-02T18:57:23+5:302022-03-02T18:57:40+5:30

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे विद्यार्थिनीचं पितळ उघडं पडलं; एका व्हिडीओनं बिंग फुटलं

Russia vs Ukraine War hardoyi village gram pradhan student trapped ukraine viral video | Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली

googlenewsNext

मॉस्को: रशियानं युक्रेनविरुद्ध युद्ध छेडल्यानं हजारो भारतीय अडकून पडले आहेत. युक्रेनमधून हवाई वाहतूक बंद असल्यानं शेजारच्या चार देशांमधून भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. युक्रेनला गेलेल्या भारतीयांना आणण्यासाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकल्यानं एका विद्यार्थिनीचं बिंग फुटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्याची रहिवासी असलेली एक विद्यार्थिनी युक्रेनला शिकायला गेली होती. डॉक्टरकीचा अभ्यास करायला गेलेल्या या विद्यार्थिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात ती मदत पाठवण्याचं आवाहन करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे विद्यार्थिनीचं पितळ उघडं पडलं आहे. कारण व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी हरदोई जिल्ह्यात सरपंच आहे. सरपंच असताना विद्यार्थिनी बाहेर कशी काय केली, याची चौकशी करण्याचे आदेश आता प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 

रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर एका भारतीय विद्यार्थिनीचा व्हिडीओ व्हायरल झाला. संबंधित विद्यार्थिनी हरदोई जिल्ह्याची असून ती विद्यमान सरपंच असल्याची माहिती समोर आली. तिचं नाव वैशाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वैशाली गावाला आली होती. तिनं निवडणूक जिंकली. त्यानंतर ती युक्रेनला गेली. तिचे वडील ब्लॉक प्रमुख असून समाजवादी पक्षाचे नेते आहेत. 

सांडी ब्लॉकमध्ये येत असलेल्या तेरापुरसेली गावच्या सरपंच म्हणून वैशाली निवडून आल्याचं हरदोई जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा मीरा अग्रवाल यांनी सांगितलं. वैशाली सरपंच झाली. पण कामकाज त्यांचे वडील पाहत असल्याचं त्या म्हणाल्या. वैशाली खारकीव्हमधील विद्यापीठात एमबीबीएसचा अभ्यास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश हरदोईच्या सीडीओ आकांक्षा राणा यांनी दिले आहेत.

Web Title: Russia vs Ukraine War hardoyi village gram pradhan student trapped ukraine viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.