शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

Russia vs Ukraine War: रशियाच्या युक्रेनवरील मतदानास भारतासह १३ देश अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 6:33 AM

ठरावाला दस्तुरखुद्द रशिया व चीन अशा दोघांचाच पाठिंबा

संयुक्त राष्ट्रे : युद्ध लादणाऱ्या रशियाने युक्रेनमधील नागरिकांच्या बिकट स्थितीबद्दल चिंता वाटत असल्याचा खोटा आव आणत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सादर केलेल्या ठरावावरील मतदानाला भारतासह १३ देश गैरहजर राहिले. या ठरावाला दस्तुरखुद्द रशिया व चीन अशा दोघांचाच पाठिंबा मिळाला.१५  देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने सादर केलेल्या ठरावात म्हटले होते की, युक्रेनमध्ये असंख्य नागरिकांना अन्नपाणी यांची टंचाई जाणवत आहे. त्या देशातील मुले, महिला या सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शस्त्रसंधी होण्यासाठी संबंधित देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, तसेच युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. मात्र, या ठरावात युक्रेन युद्ध रशियानेच सुरू केल्याचा अजिबात उल्लेख नव्हता. या ठरावावरील मतदानप्रसंगी भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. याआधीही सुरक्षा परिषदेत युक्रेनबाबतच्या दोन ठरावांवरील मतदानालाही भारत अनुपस्थित राहिला होता. युक्रेन युद्धाची समस्या रशियाने निर्माण केली. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी रशिया आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करीत आहे, अशी टीका अमेरिकेने केली आहे.नाटो देशांनी मदत करावी -जेलेन्स्कीकीव्ह : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले आहेत. अशा क्षणी जगभरातील लोकांनी आपापल्या देशातील चौकाचौकात, रस्त्यावर जमून युक्रेनला पाठिंबा दर्शवावा. तसेच नाटो देशांनी युक्रेनला अधिकाधिक मदत द्यावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, जगात शांतता, स्वातंत्र्य, स्थैर्य तसेच युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्व जपणेही आवश्यक आहे. ते लक्षात घेता जगभरातील नागरिकांनी युक्रेनला भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे. गेला महिनाभराच्या युद्धात शत्रूने आम्हाला नष्ट करण्याचे प्रयत्न केले. पण ते फोल ठरले, अशी जेलेन्स्की यांनी रशियाचे नाव न घेता टीका केली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया