कीव्ह/माॅस्काे/इस्तंबूल : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवून दाेन्ही देशांवरील वादावर ताेडगा काढण्यासाठी तुर्कीमध्ये झालेल्या चर्चेला माेठे यश मिळाले आहे. रशियाने कीव्ह आणि चर्निहाईव्ह या शहरांवरील हल्ले कमी करण्यास तत्त्वत: सहमती दर्शविली आहे. मात्र, दाेन्ही देशांमध्ये युद्धविरामाबाबत निर्णय हाेऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमीर जेलेन्स्की यांची तुर्कीमध्ये भेट हाेण्याची शक्यता आहे.दाेन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये इस्तंबूल येथे चर्चेची फेरी पार पडली. त्यानंतर रशियाचे उपसंरक्षणमंत्री ॲलेक्झांडर फाेमिन यांनी सांगितले, की युद्ध थांबविण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कीव्ह आणि चर्निहाईव्ह या शहरांवरील हल्ले कमी करण्यात येतील. यामुळे पुढील चर्चेसाठी वातावरण निर्मिती हाेईल, असे फाेमिन म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला युक्रेनच्या लष्करानेही दुजाेरा दिला असून दाेन्ही शहरांपासून रशियन सैन्य माघार घेत असल्याचे आढळल्याचे सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्या सल्लगारांनी सांगितले, की बैठकीत युद्धविराम आणि युक्रेनच्या सुरक्षेवर भर देण्यात आला हाेता. याच मुद्द्यांवरून यापूर्वीच्या चर्चा निष्फळ ठरल्या हाेत्या. जेलेन्स्की यांनी वाटाघाटींना बळ मिळावे, यासाठी डाेनबास प्रांतामध्ये तडजाेड करण्याचीही दर्शविली हाेती. (वृत्तसंस्था)दोन्ही देशांच्या अटी काय? युक्रेनची तटस्थता तसेच बिगरअण्वस्त्रधारी देश असणे, या रशियाच्या प्रमुख अटी आहेत. त्याबाबत करार करण्यासाठीही वाटाघाटी करण्यात येत आहेत. युक्रेनच्या सुरक्षेची हमी, हा मुद्दादेखील चर्चेत ठळकपणे मांडण्यात आला. युक्रेनने तटस्थ राहण्यासाठी अटींची चाैकट तयार केली आहे. मात्र, सुरक्षेची हमी त्यांना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, पाेलंड, तुर्की अणि चीन या देशांकडून हवी आहे.एकप्रकारे नाटाेच्या समकक्ष यंत्रणा असू शकते. रशियाची त्यास सहमती अजूनही नाही. याशिवाय युक्रेनने क्रिमियाबाबतही चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.क्षेपणास्त्र हल्ल्यात इमारतीला भगदाडएकीकडे तुर्कीमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असताना रशियाने युक्रेनच्या मायकाेलाइव्ह शहरावर माेठा हल्ला केला. रशियाने या भागातील तेल साठ्यांना लक्ष्य केले. यापूर्वीही या भागावर हल्ले करण्यात आले हाेते. मात्र, त्यातून तेल साठे वाचले हाेते. याशिवाय शहरातील एका नऊ मजली प्रशासकीय इमारतीवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. त्यामुळे इमारतीला मधाेमध माेठे भगदाड पडले. या हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाल्याची माहिती जेलेन्स्की यांनी दिली. मायकाेलाइव्हचे गव्हर्नर विटाईली किम यांनी सांगितले, की रशियाने कार्यालयांमध्ये कर्मचारी पाेहाेचण्याची वाट पाहिली. त्यानंतर हल्ला केला. मी कार्यालयात गेलाे नाही म्हणून वाचलाे.तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेव्हलत कावुसाेग्लू यांनी चर्चेवर समाधान व्यक्त केले असून दाेन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती त्यांनी दिली. युद्ध पूर्णविरामाचा भारताला फायदा काय?तेलाच्या किमती : युद्धामुळे भडकलेल्या कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होतील. त्यामुळे कदाचिद दरवाढ थांबेल. महागाई : युद्धामुळे अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. त्यांच्या भाववाढीला ब्रेक लागू शकेल.बाजार वधारेल : युद्धाच्या भितीने गेल्या काही आठवड्यात शेअर बाजार चांगलाच कोसळला. तोही वधारू शकेल.थेट भेटून चर्चायापूर्वी बेलारुसमध्ये दाेन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून चर्चा झाली हाेती. यावेळी प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली.
Russia vs Ukraine War: युद्ध थांबणार? तुर्कीतील चर्चेनंतर यश, पुतिन-जेलेन्स्की समाेरासमाेर भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:54 AM