Russia vs Ukraine War: जेवण मिळेना, इंधन येईना! रशियन सैनिक रडकुंडीला; सेंट्रल कमांडला झाप झाप झापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:38 PM2022-03-02T14:38:48+5:302022-03-02T14:39:04+5:30

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकांचं मनोधैर्य खच्ची; कुठे जायचं, काय खायचं, काहीच समजेना

Russia vs Ukraine War russian troops disarray crying combat radio messages reveal | Russia vs Ukraine War: जेवण मिळेना, इंधन येईना! रशियन सैनिक रडकुंडीला; सेंट्रल कमांडला झाप झाप झापले

Russia vs Ukraine War: जेवण मिळेना, इंधन येईना! रशियन सैनिक रडकुंडीला; सेंट्रल कमांडला झाप झाप झापले

Next

मॉस्को: रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करून आठवडा झाला आहे. दोन दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेऊ, असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होता. मात्र युक्रेनी सैन्यानं जबरदस्त शौर्य दाखवत रशियन सैन्याशी दोन हात केले. त्यामुळे आता रशियन सैन्याच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाला आहे. रसद पुरवठा होत नसल्यानं रशियन सैनिक त्रासले आहेत. त्यांच्या रेडिओ संभाषणातून याबद्दलचा उलगडा झाला आहे.

युक्रेनवर हल्ला करण्यासाठी गेलेले रशियन सैनिक गोंधळले असल्याचं दिसत आहे. ब्रिटिश गुप्तचर कंपनीच्या हाती लागलेल्या व्हॉईज रेकॉर्डिंगमधून ही बाब समोर आली आहे. युक्रेनमधील शहरांवर हल्ले करणार नाही, असं सैनिक स्पष्टपणे सेंट्रल कमांडला सांगत आहेत. जेवण आणि इंधन मिळत नसल्याची तक्रारदेखील रशियन सैनिक सेंट्रल कमांडकडे करत आहेत.

शॅडो ब्रेक गुप्तचर कंपनीनं रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरल्यापासून त्यांच्या संभाषणावर लक्ष ठेवलं आहे. यातील एका रेकॉर्डिंगमध्ये रशियन सैनिक रडत असल्याचं त्याच्या आवाजावरून स्पष्ट होत आहे. दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये सैनिक संतापून संवाद साधत असल्याचं लक्षात येत आहे. अन्न आणि इंधन कधी मिळणार, असा प्रश्न तो तावातावानं विचार आहे. आम्ही तीन दिवसांपासून इथे आहोत. रसद केव्हा पुरवली जाणार, असा सवाल सैनिक विचारत आहे.

तिसऱ्या मेसेजमध्ये सैनिक आणि सेंट्रल कमांडमधील शाब्दिक बाचाबाची रेकॉर्ड झाली आहे. जोपर्यंत स्थानिक जनता त्यांची घरं रिकामी करत नाही, तोपर्यंत आम्ही नागरी वस्त्यांवर हल्ले करू शकत नाही, याची आठवण रशियन सैनिकानं सेंट्रल कमांडमधील सहकाऱ्याला करून दिली आहे.

युक्रेनमधील रशियन सैन्य गोंधळलेल्या स्थितीत असल्याचं संभाषणांमधून स्पष्ट होत असल्याचं शॅडो ब्रेकचे संस्थापक सॅम्युएल कार्डिल्लो यांनी सांगितलं. आपण नेमके कुठे जातोय, एकमेकांशी संवाद कसा साधायचा, याबद्दल त्यांना माहिती नाही. काही वेळा सैनिक रडताहेत, काही वेळा त्यांचे एकमेकांशी वाद होताहेत, असं मेसेज ऐकल्यावर लक्षात येतं. यातून रशियन सैन्याचं मनोधैर्य कसं आहे ते दिसून येतं, असं कार्डिल्लो म्हणाले.

Web Title: Russia vs Ukraine War russian troops disarray crying combat radio messages reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.