Russia vs Ukraine War: नाद खुळा! युक्रेनी नागरिकांनी रशियन टँक पळवला; फुल स्पीडमध्ये लाँग ड्राईव्हला नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:03 PM2022-03-03T18:03:07+5:302022-03-03T18:03:28+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनी नागरिक सैन्यासोबत लढताहेत; रशियन फौजांना मोठा दणका
कीव: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. दोन्ही देशांमधला तणाव कायम आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियाशी दोन हात करत आहे. युक्रेनी जवान मायभूमीच्या रक्षणासाठी लढत आहेत. त्यात आता युक्रेनी नागरिकही रशियन सैन्याची डोकेदुखी वाढवत आहेत.
ट्रॅक्टरला रशियन रणगाडा बांधून तो पळवून नेणाऱ्या युक्रेनी शेतकऱ्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला. यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. काही युक्रेनी नागरिकांनी रशियन रणगाड्यावर कब्जा केला आहे. युक्रेनी नागरिक केवळ इतकं करून थांबले नाहीत. त्यानंतर ते रणगाडा घेऊन फिरायला गेले. बर्फाच्छादित भागावर फिरताना त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
#Слатино, Харьковская обл.: тероборона где-то отжала российский танк на ходу https://t.co/050tMba0cI#RussiaUkraineWarpic.twitter.com/9jfXPegj4q
— Necro Mancer (@666_mancer) March 2, 2022
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ २४ सेकंदांचा आहे. त्यात एक ग्रुप दिसत आहे. त्यांनी रशियन रणगाडा ताब्यात घेऊन तो पूर्ण वेगात पळवला आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती फोनवर संपर्ण घटना चित्रित करत आहे. आम्ही करून दाखवलं, असं तो व्यक्ती ओरडत आहे. यावेळी रणगाड्यावर बसलेले त्याचे मित्र हसत आहेत.
व्हिडीओत दिसणारा रणगाडा टी-८० बीव्हीएम आहे. आठवड्याभरापासून युद्ध सुरू असताना अनेक रशियन सैनिकांनी शरणागती पत्करली आहे. काही जणांनी युद्धभूमीतून पळ काढला आहे. काही जण शस्त्र आणि वाहनं सोडून रशियाला परतले आहेत. युक्रेनी सैनिकांना त्यांच्या देशबांधवांची चांगली साथ मिळत असल्याचं चित्र काही दिवसांपासून दिसत आहे.