Russia vs Ukraine War: युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:39 AM2022-04-07T10:39:29+5:302022-04-07T10:41:11+5:30

Russia vs Ukraine War: सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये पश्चिमी किव्हच्या एका गावात पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांना युक्रेनी सैनिक मारताना दिसत आहेत.

Russia vs Ukraine War: UN says Ukraine-Russia war will last for year; Pentagon says Ukraine will win because of Vladimir Putin | Russia vs Ukraine War: युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार

Russia vs Ukraine War: युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ४३ व्या दिवशीही सुरू आहे. युक्रेनमधील मारियुपोलमध्ये रशियाने कहर केला आहे. येथील महापौर म्हणाले की, शहरात आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) आज गुरुवारी मतदान केले जाणार आहे. असे असताना नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी हे युद्ध काही महिने किंवा वर्षे चालू राहणार असल्याचे भाकित केले आहे. 

जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धाला काही महिने किंवा वर्षे लागू शकतात, त्यामुळे रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा देणे सुरू ठेवले पाहिजे. युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकेल, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी बुधवारी केला. यामागे पुतिन यांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

युक्रेनी सैन्याने घेतला बुचा हत्याकांडाचा बदला
युक्रेनचे शहर बुचामध्ये रशियन फौजांनी युक्रेनी नागरिकांची पाठीमागे हात बांधून नृशंस हत्या केली होती. रस्त्या रस्त्यावर  पडलेले मृतदेहांचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरातून रशियावर टीका होत होती. यामुळे संपप्त झालेल्या युक्रेनी सैनिकांनी तेथून ११ किमीवर रशियाच्या या घाणेरड्या कृत्याचा बदला घेतला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये पश्चिमी किव्हच्या एका गावात पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांना युक्रेनी सैनिक मारताना दिसत आहेत. न्यू यॉर्क टाईम्सने या व्हिडीओची पुष्टी केली आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनी सैनिक रशियन सैनिकाकडे पाहून म्हणत आहे, ''हा अजून जिवंत आहे. या लुटारुंचे व्हिडीओ काढ, तो बघ अजूनही श्वास घेत आहे.'' असे म्हणत असतानाच एक सैनिक रशियाच्या सैनिकावर गोळी झाडतो, तरी देखील तो जिवंत असल्याने आणखी एक गोळी झाडतो. त्याच्या बाजुलाच आणखी एक रशियन सैनिक हात बांधलेल्या अवस्थेत मृत अवस्थेत आहे. 

या सैनिकांच्या हातावर पांढऱ्या रंगाचे कापड आहे, जे रशियन सैनिक बांधतात. तो जखमी सैनिक डोक्यावर जॅकेटने झाकून घेताना दिसत आहे. तर मारणाऱ्या सैनिकांकडे युक्रेनी झेंडे दिसत आहेत. हा व्हिडीओ दिमित्रिव्का गावातील आहे. विखुरलेली शस्त्रे, सैनिकांचे बूट आणि हेल्मेट रस्त्यावर दिसत आहेत. हे गाव बुचापासून अवघ्या 11 किमी अंतरावर आहे, जिथे काही दिवसांपूर्वी सामुहिक कबरीत सामान्य नागरिकांच्या कपड्यात शेकडो मृतदेह सापडले होते. तेव्हापासून रशियन सैन्यावर नागरिकांच्या हत्येचा आरोप होत असून त्याला 'बुचा नरसंहार' म्हटले जात आहे. या हत्यांकडे बूचाचा बदला म्हणून पाहिले जात आहे.
 

Web Title: Russia vs Ukraine War: UN says Ukraine-Russia war will last for year; Pentagon says Ukraine will win because of Vladimir Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.