Russia vs Ukraine War: युक्रेनी जनतेनं आता हे स्वीकारायला हवं की...; जेलेन्स्कींचं मोठं विधान; रशियाविरुद्धचं युद्ध संपणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:19 PM2022-03-15T19:19:30+5:302022-03-15T19:20:00+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांचा पवित्रा बदलला; रशियाविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याची दाट शक्यता
कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप तरी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नाही हे देशातील जनतेनं स्वीकारायला हवं, असं जेलेन्स्की म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक याबद्दलचं वृत्त दिलं आहे. युक्रेननं नाटोचा सदस्य होण्याच्या दिशेनं पावलं उचलल्यानं रशियानं आक्रमक पवित्रा घेतला. त्याचं रुपांतर पुढे युद्धात झालं. यानंतर आता युक्रेनच्या अध्यक्षांनी नाटोच्या सदस्यत्वाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. जेलेन्स्की यांनी मवाळ भूमिका घेतल्यानं रशियाविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Zelensky says Ukraine must accept fact that it won't join NATO, reports Sputnik.
— ANI (@ANI) March 15, 2022
एकीकडे जेलेन्स्की यांनी मवाळ नरमाईची भूमिका घेतली असल्यानं दुसरीकडे रशिया आणि युक्रेनची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत रशियानं युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. त्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. राजधानी कीव्हवर रशियन फौजांनी आक्रमण केलं आहे. अनेक आघाड्यांवर रशियन सैन्य युक्रेनवर वरचढ ठरत आहे. त्यामुळे युक्रेनसमोरील अडचणी वाढल्या आहेत.