Russia vs Ukraine War: युक्रेनी सैन्याने मिळवला कीव्हच्या उपनगराचा पुन्हा ताबा; रशियन सैन्याला हुसकावून लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:33 AM2022-03-23T06:33:10+5:302022-03-23T06:33:31+5:30

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी पुन्हा नाटाेच्या सदस्यतेचा मुद्दा उपस्थित केला

Russia vs Ukraine Wat Russian troops forced out of Kyiv suburb, says Ukrainian army | Russia vs Ukraine War: युक्रेनी सैन्याने मिळवला कीव्हच्या उपनगराचा पुन्हा ताबा; रशियन सैन्याला हुसकावून लावले

Russia vs Ukraine War: युक्रेनी सैन्याने मिळवला कीव्हच्या उपनगराचा पुन्हा ताबा; रशियन सैन्याला हुसकावून लावले

Next

कीव्ह/लवीव : हायपरसाॅनिक क्षेपणास्त्रासह भीषण अस्त्रांचा वापर करूनही रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हचा ताबा घेता आलेला नाही. उलट कीव्हमधील मकरीव्ह या उपनगराचा युक्रेनने पुन्हा ताबा मिळविला आहे. त्यामुळे रशियाला माेठा झटका बसला आहे. त्यानंतर रशियाने मारियुपाेलमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी पुन्हा नाटाेच्या सदस्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. युक्रेनने नाटाेचे सदस्य हाेऊ नये, हे रशियाने केलेल्या आक्रमणाचे प्रमुख कारण आहे; मात्र जेलेन्सकी यांनी त्याबाबत पुन्हा वक्तव्य केले. संरक्षणाची हमी मिळणार असल्यास युक्रेन नाटाेच्या सदस्यतेबाबत विचार करणार असल्याचे जेलेन्सकी म्हणाले. त्यामुळे रशिया संतप्त हाेण्याची शक्यता असून, आणखी तीव्र हल्ले करू शकताे, असे मत संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युराेपियन देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही जेलेन्सकी यांनी केली आहे.

रशियन फाैजांनी मारियुपाेल बंदर ताब्यात घेण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले; मात्र आठवडाभर भीषण बाॅम्बहल्ले करूनही रशियाला शहराचा ताबा घेता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्याने रशियाचा कडवा प्रतिकार केल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

एक काेटी लाेकांनी युक्रेन साेडला
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक काेटींहून अधिक नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडावे लागले आहे. 

मेडिकलच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी
युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे तेथील विद्यापीठांनी ‘केआरओके-२’ किंवा दुसरी सेमिस्टर परीक्षा रद्द करून, या विद्यार्थ्यांना एमबीबीएसची पदवी देणार असल्याचे कळविले आहे. 
यासंदर्भात युक्रेनच्या सरकारने अधिसूचना जारी केली आहे. ‘केआरओके-२’ परीक्षा सप्टेंबर २०२२ मध्ये हाेणे अपेक्षित हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधिक आनंद झालेला आहे. 
पश्चिम बंगालसह काही राज्यांनी अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

भारताची भूमिका असामंजस्याची- बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी रशियाच्या आक्रमणासंदर्भात भारताची भूमिका असामंजस्याची असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या बहुतांश मित्रराष्ट्रांनी पुतिनविराेधात आक्रमक भूमिका घेऊन एकजूट दाखविली आहे. भारताला साेडल्यास क्वाड गटात एकजूट आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियादेखील रशियाच्या विराेधात एकत्र आहेत, असे बायडेन म्हणाले. बायडेन यांनी अमेरिकन कंपन्यांना रशियाकडून सायबर हल्ल्याबाबत सावध केले आहे. 

Web Title: Russia vs Ukraine Wat Russian troops forced out of Kyiv suburb, says Ukrainian army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.