शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Russia vs Ukraine War: युक्रेनी सैन्याने मिळवला कीव्हच्या उपनगराचा पुन्हा ताबा; रशियन सैन्याला हुसकावून लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 6:33 AM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी पुन्हा नाटाेच्या सदस्यतेचा मुद्दा उपस्थित केला

कीव्ह/लवीव : हायपरसाॅनिक क्षेपणास्त्रासह भीषण अस्त्रांचा वापर करूनही रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हचा ताबा घेता आलेला नाही. उलट कीव्हमधील मकरीव्ह या उपनगराचा युक्रेनने पुन्हा ताबा मिळविला आहे. त्यामुळे रशियाला माेठा झटका बसला आहे. त्यानंतर रशियाने मारियुपाेलमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी पुन्हा नाटाेच्या सदस्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. युक्रेनने नाटाेचे सदस्य हाेऊ नये, हे रशियाने केलेल्या आक्रमणाचे प्रमुख कारण आहे; मात्र जेलेन्सकी यांनी त्याबाबत पुन्हा वक्तव्य केले. संरक्षणाची हमी मिळणार असल्यास युक्रेन नाटाेच्या सदस्यतेबाबत विचार करणार असल्याचे जेलेन्सकी म्हणाले. त्यामुळे रशिया संतप्त हाेण्याची शक्यता असून, आणखी तीव्र हल्ले करू शकताे, असे मत संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युराेपियन देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही जेलेन्सकी यांनी केली आहे.रशियन फाैजांनी मारियुपाेल बंदर ताब्यात घेण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले; मात्र आठवडाभर भीषण बाॅम्बहल्ले करूनही रशियाला शहराचा ताबा घेता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्याने रशियाचा कडवा प्रतिकार केल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.एक काेटी लाेकांनी युक्रेन साेडलासंयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक काेटींहून अधिक नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडावे लागले आहे. मेडिकलच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवीयुक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे तेथील विद्यापीठांनी ‘केआरओके-२’ किंवा दुसरी सेमिस्टर परीक्षा रद्द करून, या विद्यार्थ्यांना एमबीबीएसची पदवी देणार असल्याचे कळविले आहे. यासंदर्भात युक्रेनच्या सरकारने अधिसूचना जारी केली आहे. ‘केआरओके-२’ परीक्षा सप्टेंबर २०२२ मध्ये हाेणे अपेक्षित हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधिक आनंद झालेला आहे. पश्चिम बंगालसह काही राज्यांनी अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करून देण्याचे आश्वासन दिले आहे.भारताची भूमिका असामंजस्याची- बायडेनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी रशियाच्या आक्रमणासंदर्भात भारताची भूमिका असामंजस्याची असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या बहुतांश मित्रराष्ट्रांनी पुतिनविराेधात आक्रमक भूमिका घेऊन एकजूट दाखविली आहे. भारताला साेडल्यास क्वाड गटात एकजूट आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियादेखील रशियाच्या विराेधात एकत्र आहेत, असे बायडेन म्हणाले. बायडेन यांनी अमेरिकन कंपन्यांना रशियाकडून सायबर हल्ल्याबाबत सावध केले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया