रशिया युक्रेनचा 'गेम' करणार? पुतिनला भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये जाणार किम जोंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 09:55 AM2023-09-05T09:55:27+5:302023-09-05T09:58:36+5:30

उत्तर कोरियाकडून रशिया शस्त्रास्त्रे विकत घेण्याची जोरदार चर्चा

Russia will play games against Ukraine as North Korea Kim Jong will go to Moscow to meet Vladimir Putin | रशिया युक्रेनचा 'गेम' करणार? पुतिनला भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये जाणार किम जोंग

रशिया युक्रेनचा 'गेम' करणार? पुतिनला भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये जाणार किम जोंग

googlenewsNext

Russia North Korea - Kim Jong Vladimir Putin: उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन लवकरच रशियाला जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊ शकतात. या दरम्यान क्रेमलिन युक्रेनमधील युद्धासाठी किम जोंग यांच्याकडून लष्करी शस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्याने केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने वृत्तसंस्था एपीला सांगितले की, अमेरिकेचा असा अंदाज आहे की या महिन्यात किम जोंग यांचा दौरा घडू शकतो. ही बैठक कुठे आणि केव्हा होणार याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. पण असे असले तरी उत्तर कोरियापासूनचे अंतर पाहता दोन्ही नेत्यांमध्ये पॅसिफिक बंदर शहर व्लादिवोस्तोक येथे भेट होऊ शकते.

शोईगु यांनी अलीकडेच प्योंगयांगला भेट दिली

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एड्रिएन वॉटसन यांनी सोमवारी सांगितले की, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी अलीकडेच प्योंगयांगचा प्रवास केला होता आणि उत्तर कोरियाला रशियाला तोफखाना दारूगोळा विकण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

अमेरिकेचे उत्तर कोरियाला आवाहन

वॉटसन म्हणाले, "आमच्याकडे अशी माहिती आहे की किम जोंग उन यांनी रशियामधील राजनैतिक सहभागासह या चर्चा सुरू ठेवण्याची अपेक्षा केली आहे." ते म्हणाले की, अमेरिका उत्तर कोरियाला "रशियाशी शस्त्रास्त्र चर्चा थांबवण्याची आणि प्योंगयांगच्या सार्वजनिक वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी रशियाला शस्त्रे प्रदान किंवा विकू नये" असे आवाहन करत आहे.

पुतिन यांनी हे पत्र रशियाच्या संरक्षणमंत्र्यांमार्फत पाठवलं

रशियाचे संरक्षण मंत्री शोईगु यांनी सोमवारी सांगितले की, दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संयुक्त युद्ध खेळ आयोजित केले जाऊ शकतात. किम जोंग यांनी पुतीन यांना या महिन्यात रशियात भेटण्याची योजना आखल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने सर्वप्रथम दिले होते. व्हाईट हाऊसने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, पुतिन आणि किम यांनी शोईगुच्या भेटीनंतर पत्रांची देवाणघेवाण केल्याची गुप्तचर माहिती आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की ही पत्रे "वरवरच्या पातळीवर" होती, परंतु शस्त्रास्त्र विक्रीवर रशियन आणि उत्तर कोरियाची चर्चा पुढे जात आहे.

Web Title: Russia will play games against Ukraine as North Korea Kim Jong will go to Moscow to meet Vladimir Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.