Video : Russia-Ukraine युद्धाची नव्हे या रशियन बाईला आहे वेगळीच चिंता; तिच्या रडण्याचा Video पाहिल्यानंतर सारे 'कोमात'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:14 PM2022-03-12T19:14:33+5:302022-03-12T19:15:24+5:30
Russian blogger cries : एक चिमुरहा हातावर मोबाईल नंबर आणि हातात एक पत्र घेऊन एकटाच जीव वाचवण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याच्या वृत्ताने साऱ्यांना रडवले.
Russian blogger cries : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अर्धामहिना संपत आला तरी देखील रशियाला काही एक दोन शहरे वगळता ताब्यात घेता आलेले नाही. कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जंग जंग पछाडत आहे. अशातच रशियाचा मित्र देश आणि शेजारी बेलारूसही युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने केला आहे. या युद्धजन्य परिस्थिती मनाला चटका लावणारी अनेक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे... Russia-Ukraine युद्धामुळे झालेल्या जिवीत हानी किंवा मालमत्तेच्या नुकसानामुळे नाही तर तिला वेगळीच चिंता सतावत आहे.
ही महिला इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. सोमवारी Meta या सोशल नेटवर्किंग साईटने इंस्टाग्राम अकाऊंटवरून 80 मिलियन लोकांना हटवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्हॅदिमिर पुतीन हे रशियात इंस्टाग्रामवरच बंदी घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले. पण, या निर्णयाने एका रशियन ब्लॉगरची चिंता वाढवली आहे. तिचा हा व्हिडीओ जवळपास 1 मिलियन लोकांनी पाहिला आणि रिट्विटही केला आहे. रिट्विट करणाऱ्यांमध्ये आरोग्य सचिव साजीद जावीद हेही आहेत.
"it's my whole life, its my soul," she says https://t.co/YhTkBLJyXq
— Anne Applebaum (@anneapplebaum) March 12, 2022
One of the #Russian bloggers cries that in two days her Instagram will stop working
She does not care at all about the thousands of dead people, including her compatriots. Obviously, her biggest worry right now is that she won't be able to post pictures of food from restaurants. pic.twitter.com/LSdBiSlwHr— NEXTA (@nexta_tv) March 11, 2022
✅English Translation: pic.twitter.com/RfkrIEs0e2— Mrwp.io - WordPress Speed, SEO, and Security (@prayer4ukraine) March 12, 2022
आता ही महिला काय म्हणतेय हे जाणून घेऊया...
इंस्टाग्राम हे फक्त माझ्यासाठी उत्पन्नाचे साधन आहे, असे तुम्हाला वाटते का? हे माझ्यासाठी आयुष्य आहे. माझी आत्मा आहे. सलग पाच वर्ष मी इंस्टाग्रामवर दिवस-रात्र घालवतेय.