Russian blogger cries : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अर्धामहिना संपत आला तरी देखील रशियाला काही एक दोन शहरे वगळता ताब्यात घेता आलेले नाही. कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया जंग जंग पछाडत आहे. अशातच रशियाचा मित्र देश आणि शेजारी बेलारूसही युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने केला आहे. या युद्धजन्य परिस्थिती मनाला चटका लावणारी अनेक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे... Russia-Ukraine युद्धामुळे झालेल्या जिवीत हानी किंवा मालमत्तेच्या नुकसानामुळे नाही तर तिला वेगळीच चिंता सतावत आहे.
ही महिला इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. सोमवारी Meta या सोशल नेटवर्किंग साईटने इंस्टाग्राम अकाऊंटवरून 80 मिलियन लोकांना हटवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्हॅदिमिर पुतीन हे रशियात इंस्टाग्रामवरच बंदी घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले. पण, या निर्णयाने एका रशियन ब्लॉगरची चिंता वाढवली आहे. तिचा हा व्हिडीओ जवळपास 1 मिलियन लोकांनी पाहिला आणि रिट्विटही केला आहे. रिट्विट करणाऱ्यांमध्ये आरोग्य सचिव साजीद जावीद हेही आहेत.