शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:02 PM

ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

ठळक मुद्देजगातील 20 देशांकडून या लसीचे तब्बल एक अब्ज डोस तयार करण्याची ऑर्डर रशियाला मिळाली आहे. लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.लस तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनीही टोचून घेतली लस

मॉस्को -रशियाने तयार केलेल्या कोरोना व्हायरसवरील (world’s first coronavirus vaccine) लसीला आरोग्य मंत्रालयाचीही मंजूरी मिळाली आहे. यांसंदर्भात खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी मंगलवारी घोषणा केली. पुतिन यांनी सांगितले, की ही लस त्यांच्या मुलीला पूर्वीच देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी स्वतः ही लस घेतली की नाही, हे स्पष्ट केले नाही. याच बरोबर जगातील 20 देशांकडून या लसीचे तब्बल एक अब्ज डोस तयार करण्याची ऑर्डरदेखील मिळाली असल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, कोण-कोणत्या देशांनी ही ऑर्डर दिली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

पुतिन म्हणाले, 'माझ्या मुलीनेही ही लस घेतली आहे. सुरुवातीला तिला हलका ताप होता. मात्र, आता ती एकदम ठीक आहे.' पुतिन म्हणाले, मात्र मुलगी ठीक असून तिला अत्यंत चांगले वाटत आहे. तिनेही या संपूर्ण परीक्षणात भाग घेतला होता. पुतिन यांच्या या घोषणेनंतर, लस तयार करण्याचे काम पूर्ण केल्याचा दावा करणारा रशिया हा जगातला पहिला देश ठरला आहे. ही लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर वृद्धांना देण्यात येणार आहे. अनेक देशांना ही लस पुरवण्यासंदर्भातही रशियाने भाष्य केले आहे. ते सप्टेंबर महिन्यापासून लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला सुरुवात करू शकतात. 

ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यापासून लसिकरणाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.

लस तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनीही टोचून घेतली लस -मॉस्‍कोतील गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांनी दावा केला आहे, की या लसीत जे पार्टिकल्स यूज झाले आहेत. ते स्वतःला रेप्लिकेट (कॉपी) करू शकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, संशोधनात आणि मॅन्यूफॅक्‍चरिंगमध्ये सहभागी असलेल्या अनेक मंडळींनी स्वतःहाही ही लस टोचून घेतली आहे.

काही लोकांना लस दिल्यानंतर ताप येण्याची शक्यता आहे. त्यांना पॅरासिटामॉलचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, रशियाच्या या घाईवर अनेक मोठ्या फार्मा कंपन्यांनी टीका केली आहे. आरोग्य मंत्री मिखाईल मुराशको यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रात, असोसिएशन ऑफ क्लिनिकल ट्रायल्‍स ऑर्गनायझेशनने म्हटले आहे, की अद्याप 100 पेक्षाही कमी लोकांना डोस देण्यात आला आहे. अशात मोठ्या प्रमाणावर याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते.

अद्याप जगभरात कोरोना लसीची चाचणी सुरू आहे -रशियाने लस लॉन्च केली आहे, तर उर्वरित जग सध्या कोरोना लसींची चाचणी करीत आहे. यूएसए, यूके, इस्त्राईल, जपान, चीन भारत यासह अनेक देशांमध्ये लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात एकूण ५ लसी पोहोचल्या असून ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक निकाल अपेक्षित आहे.

या लसीसाठी किती खर्च येईल? -टीएएसएस या रशियन एजन्सीच्या म्हणण्यानुसार ही लस रशियामध्ये 'विनाशुल्क' उपलब्ध होईल. यावरील खर्च देशाच्या अर्थसंकल्पातून दिला जाईल. उर्वरित देशांची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

रशियाने कोरोनावरील यशस्वी लस तयार केल्याचा दावा केला असला तरी, या लसीकडे जगभरातील अनेक देश संशयाच्या नजरेने बघत आहेत. या लसीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

कोरोनाचा सामना : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक, तयार केला 'मेगा प्लॅन'

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनmedicineऔषधं