Russia Girl Yellow Jacket Photo: गेल्या दोन वर्षांपासून पेक्षा अधिक काळापासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देश अतिशय आक्रमकपणे एकमेकांच्या सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान रशियाच्या एक पत्रकार इंटोनिडा स्मोलिना (Antonida Smolina) यांना एका अजब अनुभवाला सामोरे जावे लागले. 38 वर्षीय स्मोलिना यांनी कधी असा विचारही केला नव्हता की त्यांच्या कपड्यांच्या रंगांवरून त्यांची पोलीस चौकशी केली जाईल. वेलीकी उत्सयुग येथे राहणाऱ्या मुलींना यांना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोवरून थेट पोलिसांकडून चौकशीसाठी फोन आला. नक्की काय आहे यामागचे प्रकरण जाणून घेऊया.
स्मोलिना यांनी निळ्या आकाशाखाली पिवळ्या रंगाचे जॅकेट घालून एक फोटो पोस्ट केला होता या फोटोवरून वॅलरी पी नामक एका व्यक्तीने स्मोलिना यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले होते की हा फोटो पोस्ट करून स्मोलिना यांनी युक्रेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे निळा आणि पिवळा रंग हे युक्रेनच्या राष्ट्रध्वजातील कॉम्बिनेशन असल्याने त्यांच्या विरोधात अशी तक्रार दाखल करण्यात आली. स्वतःस मुलींना यांनीच याबद्दल माहिती दिली.
स्मोलिना यांच्यावर प्रतिस्पर्धी देशातील प्रतिकांचे समर्थन करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र स्मोलिना यांनी आपल्या जॅकेटचा रंग युकरिनच्या पिवळ्या रंगाशी मिळता जुळता नसून क्रायोला रंगाचा असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी देखील याबाबत प्रकरण फार न वाढवता चौकशी थांबवली.
या घटनेच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर रशिया सरकार बाबत अनेक ठिकाणी करण्यात आल्या काहींनी असे लिहिले की रशियातील कठोर कायदे तुमच्या कपड्यांच्या निवडीवरून तुम्हाला कशा पद्धतीने राजकीय त्रास देऊ शकतात याची ही घटना साक्ष देत आहे. तर काहींनी एका सामान्य रंगाच्या कपड्याचा राजकीय संबंध जोडल्यामुळे रशियन सरकारची आणि पोलिसांची खिल्ली उडवली.