जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलंय. अशात रशियात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने 5 लोकांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. हत्या कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पाचही लोक आरोपीच्या घराखाली जोरजोरात गप्पा करत होते म्हणून त्याने या पाच जणांवर गोळ्या झाडल्या.
रशियाची राजधानी रिजाय मॉस्कोपासून 200 किलोमीटर दूर येल्तमामध्ये ही घटना घडली असून सगळीकडे या घटनेची चर्चा रंगली आहे. घटनेनंतर प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजता 5 लोक एका घराखाली आपापसात जोरजोरात गप्पा करत होते. त्यांचा आवाज ऐकून आरोपीने बाल्कनीत त्या लोकांना कमी आवाज करण्याची विनंती केली.
दरम्यान, आरोपी आणि खाली असलेल्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी घरातील रायफल आणून थेट पाचही लोकांवर गोळ्या झाडल्या. फायरिंगनंतर पाचही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. मारल्या गेलेल्या पाच लोकांमध्ये 4 पुरूष आणि एक महिला होती.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या व्यक्तीचं वय 32 वर्षे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीचं नाव जाहीर करण्यास नकार दिलाय. त्याच्याकडून रायफलही जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांना जीव कोरोनामुळे जात आहे. अशात रशियात या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. रशियात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. पण काही लोक बाहेर फिरत आहेत.
रशियामध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 5389 केसेस समोर आल्या आहेत. तर 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. इथे जास्तीत जास्त लागण ही राजधानी मॉस्कोत समोर आली आहे. आता तर रशियात अनेक ऑफिसेस बंद करण्यात आली आहेत.