Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं; रशियन मीडियाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:19 PM2022-03-04T19:19:03+5:302022-03-04T20:34:04+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे.

Russian media claim that Ukrainian President Volodymyr Zelensky has left Ukraine | Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं; रशियन मीडियाचा खळबळजनक दावा

Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं; रशियन मीडियाचा खळबळजनक दावा

googlenewsNext

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं असून ते सध्या पोलंडमध्ये पोहचल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. अलीकडेच झेलेन्स्कीने युद्धाच्या काळात देश सोडल्याची बातमी आली होती. अशा परिस्थितीत आता वोलोदिमीर जेलेन्स्की पोलंडमध्ये असल्याची माहिती रशियन मीडियाने दिली आहे. दरम्यान, आजचं जेलेन्स्की यांना तीनवेळी मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. ब्रिटनचे वृत्तपत्र  The Times ने हा खळबळजनक दावा केला.

युक्रेनमध्ये युद्धाच्या विरोधात ही एजन्सी असल्याने तिने रशियाचे हे कट उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. जेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाने भाड्याचे गुंड पाठविले होते. हे लोक रशिया समर्थित वैगनर ग्रुप आणि चेचेन विशेष दलाचे होते. मात्र, याची माहिती रशियन फेडरल सिक्योरिटी ब्यूरोला असल्याने त्यांनी ते कट उधळून लावले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. 

दरम्यान, रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत.  सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

रशियाचं एसयू-२५ विमान पाडलं-

रशियाचे एसयू-२५  विमान पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने आज आणखी एक रशियन एसयू-२५ युक्रेनच्या व्होल्नोवाखाजवळ खाली पाडण्यात आले, असे नेक्टा टीव्हीने म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


 

Web Title: Russian media claim that Ukrainian President Volodymyr Zelensky has left Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.