अनेकांना आयुष्यात घेतलेला एखाचा चुकीचा निर्णय फार महागात पडत असतो. असाच एक चुकीचा निर्णय रशियातील मॉडल ग्रेटा वेडलर (Model Gretta Vedler) घेतला होता. ज्याची किंमत तिला तिचा जीव देऊन चुकवावी लागली. ग्रेटा वेडलर पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांना मनोरूग्ण म्हटलं होतं. पण तिच्या मृत्यूसोबत पुतिन यांचा काही संबंध नाही.
ग्रेटा वेडलर (Gretta Vedler) पुतिन (Vladimir Putin) यांना मनोरूग्ण म्हटल्याने केवळ चर्चेत आली होती. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा तिच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. ग्रेटाच्या मृत्यूला तिचा बॉयफ्रेन्ड जबाबदार होता. त्याने काही वादांमुळे आपली गर्लफ्रेन्ड ग्रेटाची हत्या केली होती.
२३ वर्षीय ग्रेटाच्या बॉयफ्रेन्डचं नाव होतं दिमित्री कोरोविन. त्यानेच तिची निर्दयीपणे हत्या केली होती आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गाडीत ठेवून तो फिरत राहिला होता. आता कोरोविनने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितलं की, तो ग्रेटाला ३०० मैल दूर ड्राइव्ह करत लिपेत्स्क नावाच्या ठिकाणी घेऊन गेला होता. इथेच त्याने ग्रेटाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गाडीच्या डिक्कीत बेवारस सोडला होता. ग्रेटाला कोरोविनने पैशांच्या वादातून मारलं होतं. तिच्या राजकीय विचारांशी याचा काही संबंध नव्हता.
कोरोविनने ग्रेटाच्या मृत्यूनंतर तिचं सोशल मीडिया पेज सतत अपडेट ठेवलं. जेणेकरून कुणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब होण्याचा संशय येऊ नये. त्याच्या एका यूक्रेनियन मित्राला संशय येईपर्यंत हे सगळं सुरू होतं. त्याने रशियन मित्राला याबाबत माहिती दिली. तेव्हा ग्रेटाचा शोध सुरू झाला. अखेर तिच्या बॉयफ्रेन्डने हत्या केल्याचं मान्य केलं. ग्रेटाने वर्षभरापूर्वी पुतिन यांच्याबाबत ऑनलाइन लिहिलं होतं की, ते सायकोपॅथ म्हणजेच मनोरूग्ण आहेत.