"तर रक्ताचे पाट वाहतील..."; रशियाने दिला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा; अणुयुद्धाचा धोका वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 02:51 PM2023-12-09T14:51:30+5:302023-12-09T14:51:49+5:30

युक्रेनला सैन्याची रसद पुरवणाऱ्या अमेरिकेवर रशिया नाराज

Russian president Vladimir Putin ally Dmitry Medvedev warning third world war nuclear cuban missile crisis | "तर रक्ताचे पाट वाहतील..."; रशियाने दिला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा; अणुयुद्धाचा धोका वाढला 

"तर रक्ताचे पाट वाहतील..."; रशियाने दिला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा; अणुयुद्धाचा धोका वाढला 

Russia Ukraine War, America - Third World War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती पसरत आहे. रशियाच्या राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिन कडून इशारा देण्यात आला आहे की, १९६२ मध्ये झालेल्या क्युबा मिसाईल संकटानंतर परमाणू विश्वयुद्धाचा धोका इतका कधीच वाढला नव्हता. रशियाचे माजी राष्ट्रपती आणि पुतीन यांचे निकटवर्तीय दिमित्रि मेदवेदेव यांनी रक्तपात होण्याची भविष्यवाणी केली आहे. तसेच युक्रेनला सैन्याची रसद पुरवणाऱ्या अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

मेदवेदेव म्हणाले की, युक्रेन सारख्या छोट्या देशासाठी त्यांनी कधीच एवढा पैसा खर्च केला नाही. युक्रेन अध:पतनाच्या मार्गावर आहे. मेदवेदेव यांनी या माध्यमातून बायडेन यांचा मुलगा हंटर याच्याशी संबंधित व्यापारी देवाणघेवाणीचा उल्लेख केला. पुतीन यांच्या गटातील ज्येष्ठ राजकीय नेत्याने दिलेल्या धमकीनंतर मेदवेदव यांनी हे विधान केले. ते म्हणाले होते की, जर युक्रेनचे नवे F16 लढाऊ विमाने पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानिया मध्ये असतील तर तो 'नाटो' देशासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते मारिया जखारोवा ने पश्चिमी देशांना इशारा दिला आहे की जर अडव्हान्स जेट नाटो देशात असतील तर ते रशियासाठी योग्य टार्गेट असेल. जर पुतीन यांनी याप्रकारचे पाऊल उचलले तर नक्कीच रशिया आणि पश्चिम देशात युद्ध सुरू होईल. 'क्युबा मिसाईल संकटानंतर रशिया आणि नाटो मधील वादामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच जाणवला नव्हता.' असं मेदवेदेव म्हणाले.

युद्ध होण्यासाठी उकसवणारे विधान करण्यासाठी मेदवेदेव ओळखले जातात. त्यांनी अमेरिकेच्या सर्व राष्ट्रपतींवर युद्धासाठी अर्थसहाय्य आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी संसदेला ब्लॅकमेल करण्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले, प्रशासनाकडून युक्रेनला नक्कीच अर्थसहाय्य मिळेल. तात्काळ नाही पण येत्या नवीन वर्षात  युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल. या रक्तपाताला बायडन आणि त्यांचे सहयोगी जबाबदार असतील.

Web Title: Russian president Vladimir Putin ally Dmitry Medvedev warning third world war nuclear cuban missile crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.