प्रयोगशाळेतून एकदा नव्हे, तर दोन वेळा पळून गेलेल्या बुद्धिमान यंत्रमानवाने (रोबो) रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना तर ओळखलेच व स्वत:ची खूप उत्साहाने ओळखही करून दिली. रशियातील पर्ममध्ये माहिती व तंत्रज्ञान प्रदर्शनाला पुतीन यांनी भेट दिली, त्या वेळी रोबो प्रोमोबोट-पुतीन भेट झाली. रशियाची सिलिकॉन व्हॅली म्हणून पर्मची ख्याती आहे.मोठे डोळे असलेल्या या रोबोची निर्मिती रशियाने केली आहे. मार्गदर्शक (गाइड), मॉडेल आणि एखाद्या उत्पादनाचा विक्रेता म्हणून प्रोमोबोटचा उपयोग होतो. सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहितीही हा रोबो स्वत:कडे ठेवतो. गेल्या वर्षी या रोबोने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर या रोबोला मॉस्कोतील राजकीय मेळाव्यात अटक करण्यात आली होती. तेथे तो रशियन संसदेचे उमेदवार व्हॅलेरी कालाचेव्ह यांना पाठिंबा देत होता. अधिकाºयांनी त्याला बेड्या घालून नेले. उमेदवाराच्या गटाकडून प्रक्रिया आणि विश्लेषण करण्यासाठी हा रोबो मतदारांची अनेक विषयांवरील मत-मतांतरे नोंदवून (रेकॉर्ड) घेत असल्याची खात्री पटल्यानंतर, लोकप्रतिनिधीने पोलिसांना बोलाविले होते.भरपूर गर्दी असलेल्या भागातून या रोबोला दूर न्या, असे पोलिसांनी सांगून, त्याला बेड्या घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रोमोबोटने काहीही प्रतिकार केला नाही, असे तेथे उपस्थित असणाºयांनी सांगितले. रोबोमधील बॅटºया क्षीण झाल्यामुळे तो रस्त्यात मध्येच थांबला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना रोबोने ओळखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:50 AM