Russia Crime New : रशियातून हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. इथे ३० वर्षीय फेमस रशियन रॅपर पतीचे त्याच्या पत्नीचे तुकडे केले होते. पण तिने पोलिसांना सांगितलं होतं की, औषधाच्या ओव्हरडोजमुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला. आता फॉरेन्सिक रिपोर्टमधून या गोष्टीचा खुलासा झाला आहे.
जिवंत पतीचे केले तुकडे
Daily star च्या रिपोर्टनुसार रशियन म्युझिशिअनची पत्नी जेव्हा त्याच्या शरीराचे तुकडे करत होती तेव्हा त्याचा श्वास सुरू होता आणि तो ऑक्सीजन घेत होता. हाय प्रोफाइल रशियन केसमध्ये हा खुलासा नव्या फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावर झाला आहे. पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, ३० वर्षीय एंडी कार्टराइटचे जेव्हा तुकडे केले जात होते तेव्हा तो जिवंत होता.
कार्टराइटचं खरं नाव एलेंग्जेंडर यूशको होतं. ज्याचा मृत्यू जुलै २०२० मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये त्याच्या घरीच झाला होता. आधी त्याच्या मृत्यूबाबत फार काही माहिती नव्हती. पण नंतर काही पुराव्यांच्या आधारावर हे म्हणता येईल की, हा एक सुनिश्चित खून होता.
शरीराचे तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवले
३७ वर्षीय रॅपरची पत्नी मरिना कोखलने हे मान्य केलं होतं की, तिने कार्टराइटचं शरीर कापून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं होतं. पण तिच्या पतीचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोजमुळे झाला होता. दावा तर असाही केला जात आहे की, त्याच्या पत्नीने त्याची बोटं कापून मांजरीला खाऊ घातली होती. पत्नी प्लान होता की, त्याच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्यानंतर ती सांगणार होती की, तिचा पती बेपत्ता आहे.
पुरावा नसल्याने पत्नीला सोडलं
रशियन लॉ इन्फोर्समेंटला कोखल विरोधात जास्त पुरावे सापडले नव्हते आणि हत्येचं कारणही समोर येत नव्हतं. त्यामुळे तिला ऑक्टोबरमध्ये तुरूंगातून सोडण्यात आलं होतं. हत्येचा संशय या आधारावर तिला तुरूंगात टाकलं होतं.
अनैतिक संबंधामुळे पतीची केली हत्या
कार्टराइटचं त्याची २ वर्षीय फॅन नादिया रोमानेंकोसोबत सेक्शुअल रिलेशनशिप होतं. हे त्याच्या पत्नीला समजलं होतं. याच कारणाने तिने तिच्या दगाबाज पतीची इतक्या निर्दयीपणे हत्या केली होती.