अमानुष अत्याचार! रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; लोखंडी सळीने चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:32 PM2022-04-04T16:32:45+5:302022-04-04T16:41:45+5:30

Russia Ukraine War : रशियन सैन्याच्या अनेक क्रूर गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. तर दुसरीकडे बूचा शहरात रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे.

russian soldiers raped minors branded women bodies claims ukrainian mp | अमानुष अत्याचार! रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; लोखंडी सळीने चटके

अमानुष अत्याचार! रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; लोखंडी सळीने चटके

googlenewsNext

युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती दिवसागणिक अत्यंत भीषण होत आहे. 40 दिवसांच्या या युद्धात युक्रेन अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. रशियन सैन्याच्या अनेक क्रूर गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. तर दुसरीकडे बूचा शहरात रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. रशियन सैनिक महिला आणि मुलींवर अमानुष अत्याचार करत आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला असून तिला लोखंडी सळीने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच महिलांच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली जात आहे. 

युक्रेनच्या खासदाराने गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले. महिलांच्या शरीरावर डाग केले असा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी ट्विटरवरून केला आहे. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून डाग देण्यात आले आहेत. 

हे डाग स्वस्तिकसारखे दिसत असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर करत "रशियन सैन्य युक्रेनमध्ये लोकांची लूट, बलात्कार आणि हत्या करत होते आणि रशियाला अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र म्हणून संबोधले" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनमधील अनेक शहरं ही उद्ध्वस्त झाली आहे. खारकीव्हमध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, रशिय़न सैन्याने मारियुपोल थिएटरवर केलेल्या एअक स्ट्राईकमध्ये जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युक्रेनमध्ये आता खाण्याचं संकट देखील उभं राहिलं आहे. 

परिस्थिती गंभीर! उद्ध्वस्त झालं खारकीव्ह; खाण्याचं संकट, जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड

रशियाने सर्वात जास्त कीव्ह आणि खारकीव्हला टार्गेट केलं आहे. त्यामुळेच आता खारकीव्हची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. लोक अन्नासाठी मोठमोठ्या लाईनमध्ये उभे आहेत. सातत्याने बॉम्बस्फोट असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमी सैनिक आणि सामान्य नागरिकांमुळे रुग्णालये देखील खचाखच भरलेली पाहायला मिळत आहेत. खारकीव्हमधील हन्ना स्पित्स्याना नावाची मुलगी युक्रेनी रेड क्रॉसच्या मदतीन लोकांपर्यंत अन्न पोहचवत आहेत. अनेक लोकांकडे खाण्यासाठी देखील अन्न नाही. वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असून त्यांना डायपर, चादर आणि जेवण या गोष्टींची आवश्यकता असल्याची माहिती हन्नाने दिली आहे. जेवण मिळावं म्हणून लोकांनी भलीमोठी लाईन लावली आहे. मात्र खूप तास वाट पाहिल्यावर पनीरचा फक्त एक छोटासा तुकडा मिळत आहे. लोक लगेचच मिळत असलेलं सामान घेऊन पुन्हा आपल्या घरामध्ये लपतात असं देखील हन्नाने सांगितलं आहे. 
 

Web Title: russian soldiers raped minors branded women bodies claims ukrainian mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.