Russsia-Ukraine War: बायकोमुळं यूक्रेन सोडण्यास भारतीय व्यक्तीनं दिला नकार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:57 AM2022-03-07T09:57:52+5:302022-03-07T09:58:54+5:30
यूक्रेनमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर २ दिवसांनी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतले.
कीव – रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली. त्यामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटत आहे. यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाकडून मिसाइल हल्ले सुरू आहेत. आतापर्यंत या युद्धात हजारो जवान आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. रशिया-यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. यूक्रेनमध्ये १८ हजाराहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्य करतात. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना यूक्रेनमधून मायदेशी आणण्याचं मिशन हाती घेण्यात आले आहे.
त्यातच एका भारतीय नागरिकाने मायदेशी परतण्यास नकार दिला आहे. यूक्रेनच्या युद्धात सामान्य नागरिकांचाही बळी जात आहे. भारतीयांच्या सुरक्षतेसाठी केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. आतापर्यंत अनेक भारतीय मायदेशी परतले आहेत. परंतु यूक्रेनमधील वाढता धोका पाहताही या व्यक्तीनं यूक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. या व्यक्तीचं यूक्रेन न सोडण्यामागचं कारण ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या तो यूक्रेनमधील एका मित्राच्या घरी राहत आहे.
यूक्रेनमध्ये अडकलेल्या या भारतीय नागरिकाची पत्नी गर्भवती आहे. परंतु ती भारतीय नागरीक नाही. त्यामुळे तिला भारतात आणलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच या व्यक्तीने पत्नीला एकटं सोडून भारतात येण्यास नकार दिला आहे. यूक्रेनची राजधानी कीवमधील हल्ल्यानंतर सुरक्षित स्थानावर पोहचलेल्या गगनं न्यूज एजन्सीची संवाद साधला. तो म्हणाला की, मी माझं कुटुंब आणि ८ महिन्याची गर्भवती पत्नीला यूक्रेनमध्ये सोडून परत येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे आता पोलंडला जात आहोत. सध्या तो लविवमध्ये एका मित्राच्या घरी थांबल्याचं सांगितले.
भारतीयांची शेकडो मैल पायपीट
यूक्रेनमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर २ दिवसांनी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतले. यूक्रेनच्या सरकारनं नागरिकांच्या फ्लाइट्ससाठी एअरस्पेस बंद केले. त्यामुळे भारतीय नागरिकांना पोलँड, रोमानिया, स्लोवाकिया, हंगरी आणि मोल्दोवासारख्या देशांपर्यंत पोहचण्यासाठी पायपीट करावी लागली. जेणेकरून त्याठिकाणाहून विमानाद्वारे भारतात पोहचता येईल.
मदतीसाठी केंद्राचे ४ मंत्री यूक्रेनच्या सीमेवर
यूक्रेनच्या शेजारील देशात असणाऱ्या भारतीय दूतावासांनी युद्धग्रस्त परिसरातून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यूक्रेनच्या सीमांवर चौकी उभारली आहे. एअर इंडिया आणि इंडियन एअरफोर्सच्या विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, हरदीप सिंह पुरी, वी. के सिंह आणि किरेन रिजिजू यूक्रेनच्या सीमेवर समन्वयासाठी हजर आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७६ फ्लाईट्समधून यूक्रेनमध्ये अडकलेले १५ हजार ९२० भारतीयांना सुखरुप भारतात आणलं आहे. शनिवारी आणि रविवारी १३ फ्लाइट्स नवी दिल्ली आणि मुंबई येथे पोहचल्या. त्यात अडीच हजार लोकं उपस्थित होते. रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. तर १ विद्यार्थी गोळी लागल्याने जखमी झाला आहे.