मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २०३६पर्यंत पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतिन यांनी पदावर कायम राहावं, यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. त्या घटनादुरुस्तीवर आठवडाभर मतदान प्रक्रियाही चालली, जी बुधवारी पूर्ण झाली. ही मोहीम 7 दिवस सुरू होती. २२ एप्रिल रोजीच हे मतदान घेण्यात येणार होते; परंतु कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ते पुढे ढकलण्यात आले. मतदानाची तारीख १ जुलै ही जाहीर करण्यात आली होती; परंतु मतदान केंद्रे एक आठवडाआधीच उघडण्यात आली. मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीनंही जनतेनं मतं नोंदवली आहेत.या मतदानात सुमारे ९८ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 2036पर्यंत पदावर ठेवण्यासाठी रशियाच्या जनतेने पाठिंबा व विरोध दर्शविला. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या ६७ वर्षीय अध्यक्ष पुतिन यांचा कार्यकाळ वर्ष 2024मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीला ७८ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर २१ टक्के लोकांनी त्याच्याविरोधात मतदान केलं आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचं केबीसी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे पुतिन यांना पुन्हा सहा-सहा वर्षांसाठी सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ६७ वर्षांचे आहेत, त्यांना आता वय वर्ष ८३ असेपर्यंत रशियाच्या अध्यक्षपदावर राहता येणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.
घटनादुरुस्तीच्या इतर प्रस्तावांमध्ये सामाजिक लाभ, स्त्री-पुरुष विवाहाची परिभाषा निश्चित करणे व सरकारमधील शक्तीचे वाटप आदी निर्णयांचा समावेश होता. या घटनादुरुस्तींना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेली होती व पुतिन यांच्या स्वाक्षरीनंतर त्याबाबतचे कायदेही तयार करण्यात आले. घटनादुरुस्तींवर मतदान घेऊन त्याला लोकशाही पद्धतीची मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा
चीनची कबुली! भारतात TikTok अॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान
कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा
बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
डोळे विस्फारतील! पांढऱ्या वटवाघळांना पाहून लोक म्हणाले, हे तर कापसाचे गोळे?
TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...
CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…
आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल